चर्चा:चिंच

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर या लेखात समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) १९:३५, २ मार्च २०१७ (IST)[reply]


Tamarindus indica, leaves, pod
Tamarindus indica-flowers

मराठी नाव[संपादन]

चिंच, इमली

इंग्रजी नाव[संपादन]

Tamarindus Indica Linn.

माहिती[संपादन]

चिंच म्हटले तरी आंबट गोड चवीच्या आवडीने तोंडाला पाणी सुटते. चिंचेच्या झाडाकडे लोभावून पाहणाऱ्या नजरेत झाडापेक्षा फळांचेच प्रेम अधिक असते. पण लहान थोरांना प्रिय असलेल्या या फळांचे झाड ही एक अजब चीज आहे.

चिंचेचे झाड सदाहरित वृक्षांपैकी असून सुमारे पन्नास वर्षे वयाच्या, चांगल्या जमिनीत वाढणाऱ्या झाडांची उंची सुमारे १०० फूट असते. गोलाकार पसरणाऱ्या चिंचेच्या झाडाचा डोलारा संयुक्त पानांनी तयार झालेला असतो. या झाडांची खोलवर भेगा असलेली साल, जाड, काळ्या भुरकट रंगाची असते. चिंचेचे लाकूड कठीण, दाणेदार व चिवट असते.

हे झाड मुळचे मध्य आफ्रिकेतील ॲबिसिनिया देशातले असून हजारो वर्षांपूर्वीच ते जगभर पसरले. संपूर्ण भारतात हे झाड घराजवळ, गावांत आणि रस्त्यांच्या बाजूने लावलेले दिसते.. क्वचित हे झाड जंगलातदेखील आढळते. मध्ययुगीन काळात इराकमधील बसरा बंदर हे चिंचेचे प्रमुख आयात केंद्र होते. 'भारतीय तमर' अथवा 'तमर-ए-हिंद' या नावाने चिंचेची आयात व्हायची. या नावामुळेच चिंचेचे लॅटिन नाव देखील लीन्नेयस या थोर वनस्पती शास्त्रज्ञाने Tamarindus Indica असे ठेवले. भारतीय ग्रंथांपैकी मत्स्यपुराण, अमरकोश, चरक-संहिता, सुश्रुत-संहिता यांत चिंचेचा उल्लेख तीतिंडी म्हणून केलेला आढळतो. मध्य आफ्रिकेत मूळ असलॆल्या या झाडांचा प्रसार उष्ण कटिबंधातील बहुतांश देशात कमी जास्त प्रमाणात झालेला आहे. ही चिंच सध्या नाईल नदीच्या उत्तरेकडील भागात, जावा, जमाईका, वेस्ट इंडीज, ब्राझील, मध्य अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा उष्ण कटिबंधाचा भाग, दक्षिण व मध्य भारत इत्यादी भागात मुबलक प्रमाणात आढळते. हे झाड कधीही पर्णरहित असत नाही, पण खूपच शुष्क आणि तीव्र हवामानातील खडकाळ डोंगरांच्या पायथ्याशी असलेली झाडे थोडाफार काळ उन्हाळ्यात निष्पर्ण असतात. चिंच कडक थंडीला संवेदनशील असून थंड प्रदेशात लागवड केली तर फलधारणा होत नाही. पण अत्यंत कडक उन्हाळा व पाण्याचे दुर्भिक्ष्य असले तरीही तग धरून राहते. मार्च एप्रिल महिना आला कि झाडाला नवी कोवळी पोपटी रंगाची पालवी फुटते. आणि लगेचच एप्रिल-मी मध्ये पिवळी, गुलाबी,लाल पट्टे असलेली नाजुकशी फुले भरपूर प्रमाणात येतेत आणि झाडाखाली पाकळ्यांचा छान सडा पडलेला दिसतो. हिरव्या बिया झाडावरच सुमारे सात आठ महिने परिपक्व झाल्यावर फांद्या हलवून किंवा काठीने हलकासा प्रहर करून खाली पडल्या जातात. टरफल टणक पण ठिसूळ असते. आतील तंतुमय गर तांबूस तपकिरी रंगांचा असतो. फळात सुमारे ३ ते १० लालसर तपकिरी रंगाचे द्विदल चिंचोके असतात. झाडांची लागवड प्रामुख्याने बिया रुजवून केली जाते. पण गुटी पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड देखील करतात. चिंचेची लागवड प्रामुख्याने घराजवळ, गावाजवळ, पडीक जमिनींचा वापर करण्यास, सामाजिक वनीकरण करण्यास, आग किंवा वाऱ्यांचा प्रतिबंध करण्यास, रस्ते वृक्षाच्छादित करण्यास करतात. शेतात, मळ्यात मुद्दाम चिंच आणून लावली जात नाही. चिंचेच्या झाडाचे बहुतेक सर्व भाग उपयोगी आहेत. हे लाकूड अत्यंत कठीण व टणक असल्याने गाभ्यापासून कांडप, मुसळ, फर्निचर, तेल पाणी, उसाचा रस काढण्यासाठी चरक, छपाईचे ठोकले इत्यादी वस्तू तयार करण्यास वापरतात. तसेच या लाकडाचा उपयोग काही भागात घरबांधणीसाठी व शेतीची आणि इतर अवजारे तयार करण्यासाठी देखील केला जातो. झाडाच्या फांद्यांचा वापर व इतर लाकडाचा उपयोग उत्तम सरपण म्हणून, बंदुकीच्या दारूत वापरण्यासाठी आणि कोळसा तयार करण्यासाठी करतात. डांबर उकळून प्रामुख्याने पायरोगनियस आम्ल व इतर रसायने तयार करण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. आयुर्वेद शास्त्रात व पारंपारिक औषध शास्त्रात चिंचेचे बरेच उपयोग दिलेले आहेत. झाडाची साल हि लकवा किंवा शरीराच्या अवयवाची संवेदना शिथिल झाल्यास लेप करण्यासाठी वापरतात. तसेच सालीच्या राखेचा उपयोग अल्सर, स्त्रीरोग, लघवी होण्यास त्रास होणे इत्यादी वरील औषधांमध्ये होतो. चिंचेच्या पानांचा उपयोग सूज कमी होण्यास, गजकर्ण, रक्ताचे विकार, दंतशुल, कर्णशुल, डोळ्याचे विकार, ट्युमर इत्यादी रोगांवर इलाज करण्यासाठी होतो.

बाह्य दुवा[संपादन]

https://www.google.co.in/search?q=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87+%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1&biw=1024&bih=657&source=lnms&tbm=isch&sa=X&ved=0ahUKEwj8x-GqobLSAhVFxLwKHT3aBdsQ_AUICCgB

संदर्भ[संपादन]

वृक्षराजी मुंबईची (पुस्तक; लेखक - डॉ. कमलाकर हिप्पळगावकर); प्रकाशक : मुग्धा कर्णिक