चर्चा:चक दे! इंडिया
Appearance
उल्लेखनीयता संपन्न चर्चा
[संपादन]निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.
... {{उल्लेखनीयता| कारण = पहिल्या ओळीतील '''( हिंदी:- चक दे! इंडिया, उर्दू :- چک دے انڈیا, इंग्लिश :- Chak De! India) ''' हे परभाषी आणि परलिपी मजकुराची उल्लेखनीयता}}
- लेख लिहिण्यात ज्या सर्वांनी मेहनत घेतली त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा.
- हा एक सुपरिचीत चित्रपट आहे ,चित्रपटाच्या उल्लेखनीयते बद्दल तीळमात्रही शंका नाही.पण यालेखाच्या अनुषंगाने लेखातील पहिल्या ओळीतील ( हिंदी:- चक दे! इंडिया, उर्दू :- چک دے انڈیا, इंग्लिश :- Chak De! India) हे परभाषी आणि परलिपी उल्लेख खरेच गरजेचे आणि मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने कितपत विश्वकोशीय उल्लेखनीयता ठेवतात याचा पुन्हा विचार करता येऊ शकेल किंवा कसे.
जिथे एखादा विषय मुलत: परभाषेत आहे तर त्याच मूळ रूप दाखवण्याकरिता परभाषेतील पहिल्या ओळीतील नामोच्चार दर्शन उचीत ठरते.
- हिंदी लेखन वेगळे दाखवावयास हरकत अशी नाही , पण मराठी आणि हिंदीतील उच्चारण लेखन वाचन एक सारखे असताना हिंदी असे लिहून पुन्हा लेखन दाखवण्या पेक्षा चक दे! इंडिया (हिंदी चित्रपट) अशा काही पर्यायाचा विचार होउ शकेल किंवा कसे ?
- उर्दू आणि इंग्रजी या आता भारतीय भाषा आहेत यात दुमत नाही.हिंदी चित्रपट/किंवा इतर भाषेतील सर्व भाषात डब केले जाऊ शकतात किंवा त्यांची टायटल जगातील सर्व भाषा लिपीतून लिहिली जाऊ शकतात .पण या विशिष्ट लेख उदाहरणात इतर लिपी वापरून लेखन करून दाखवण्यात, विश्वकोशाचा वाचक म्हणून माझ्या माहितीत कोणतीही अधिकची भर पडते आहे ,
- इतर लिपींशी द्वेष आहे अशातला भाग नाही पण त्यांच्या,मराठी विकिपीडियाच्या अंगणात या विशीष्ट लेखातील उपयोगाचे (मला) प्रयोजन लक्षात आले नाही.
- हा चित्रपट आणि चित्रपटाचा विषय माझ्या विशेष आत्मियतेचा आहे.चांगला लेख लिहिल्या बद्दल सर्व संपादकांना पुन्हा एकदा धन्यवाद.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:४०, १५ मे २०१३ (IST)
- आपल्या म्हणण्याशी पूर्ण सहमती. उगाच ३-४ भाषांमध्ये चित्रपटाचे नाव देण्याची काहीच गरज नाही. - अभिजीत साठे (चर्चा) २२:३४, १५ मे २०१३ (IST)