चर्चा:गॉसचा गुरुत्वाकर्षणाचा नियम
‘शिस्तीचे माझे नियम’ या colloquial या शब्दरचनेत ’माझा’वर जोर आल्याने विधान थोडे कडक आणि करारी वाटते. त्याउलट ‘माझे शिस्तीचे नियम’ यात ‘शिस्तीचे’वर जोर आल्याने विधानाचा अर्थ सौम्य होतो. वाक्यातसुद्धा ’हे माझे शिस्तीचे नियम आहेत‘, हे विधान औपचारिक वाटते आणि त्यातून कुठलाही गैर उद्देश डोकावत नाही. त्याउलट शिस्तीचे माझे नियम असे आहेत(इतरांचे कसे का असेनात!) हे विधान arrogant वाटते. याच धर्तीवर, गुरुत्वाकर्षणाचा गॉसचा नियम असे म्हटले की, हा नियम इतर नियमांना खोडून काढून, किंवा तुच्छ लेखून प्रतिपादित केला आहे, असा किंचितसा भास होतो. म्हणून मथळा बदलून ‘गॉसचा गुरुत्वाकर्षणाचा नियम‘ असा ‘गुरुत्वाकर्षणाला’ गुरुत्व देणारा मथळा केला.....J (चर्चा) २१:०४, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)
आता हा मथळा योग्य वाटतोय. इंग्लिशमधून भाषांतर करताना रचनेत थोडा गोंधळ होतो... आता ह्या प्रमाणे बाकीचे संभावित लेख दुरुस्त करून घेइन (गॉसचा विद्युतचा नियम आणि गॉसचा चुंबकीचा नियम) अनिरुद्ध परांजपे (चर्चा) २२:२४, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)
ऐकन रूप
[संपादन]लेखात ऐकन रूप असा प्रयोग आला आहे. पु्ढे फॉम्युला दिसल्यावर ही शब्द रचना बहुधा integral form या अर्थाची असावी असे वाटते. इंटिग्रलला अनेक शब्द आहेत. हा ऐकन शब्द अगदी अपरिचित वाटला. मनोगतवरील पारिभाषिक शब्दकोशांत इंटिग्रलसाठी संकलन, संकलक, समाकल, पूर्णांक, पूर्णांकी, अविभाज्य, समस्त, सकल असे अनेक शब्द दिसले. गॉसच्या फॉर्म्युला संदर्भात खालील शब्दरचना विचारात घेऊन,
integral equation Math.संकलक समीकरण (भौतिकशास्त्र) integral equation समाकल समीकरण (मराठी विश्वकोश) integral equation संकलक समीकरण (संख्याशास्त्र ) integral equation संकलक समीकरण (गणितशास्त्र) Abellian integral equationऍबेलचे संकलन समीकरण (स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश)
संकलन आणि संकलक हे दोन्ही शब्द बरे आणि प्रस्तुत विषयात समर्पक वाटतात. म्हणून ’ऐकन रूप’ या ऐवजी संकलन रूप, आणि डिफरेन्शियल फॉर्मसाठी विकलक रूप वापरता येईल का याचा विचार व्हावा...J (चर्चा) २३:४५, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)
तसा करावयास हरकत नाही. मला जेहा परिभाषिक कोशांबद्द्ल माहिती नव्हती तेव्हा मी डिफ्रेन्टिएशनला (जी क्रिया फलाचा भेद - तुकडे करते) भैदन आणि इंटेग्रेशनला (जी क्रिया फलास एकत्रीकरण करते, जोडते, पूर्ण बनविते, ऐक्य करते) ऐकन हे नाव दिले. नंतर मला कोशांमध्ये दोन्ही क्रियेस अनुक्रमे विकलन आणि संकलन ही नावे असल्याचे आढळले. तथापि, त्यांच्या क्रिया पहाता - विशेषत: इंटिग्रेशन, ज्यात संकलन (collection) होत नसून जोडून, ऐक्य करून पूर्ण केले जाते (to integrate) - मला भैदन आणि ऐकन हे शब्द योग्य वाटले आणि म्हणून मी ह्याचाच वापर करत आलो आहे... परंतु ह्यामुळ गोंधळ होणार असेल तर ते बदलण्यास हरकत नाही. अनिरुद्ध परांजपे (चर्चा) ००:१४, ४ ऑक्टोबर २०१२ (IST)