Jump to content

चर्चा:कारले

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करून येथे समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) ०९:४९, २४ मार्च २०१७ (IST)[reply]


“कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरीही कडू ते कडूच! ” अशी ओळख असणा-या कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. ग्रीष्मात आढळणाऱ्या भाज्यांमध्ये कारले एक आहे. कारल्याची वेल बरीच वर्षे जगणारी असते ती ब-याच ठिकाणी आपोआप उगवलेली सुद्धा दिसते. चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले भारतात सर्वत्र पिकते व अती प्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो. संस्कृतमध्ये कंदुरा (करवल्ली), हिंदीमध्ये करेला, इंग्रजीमध्ये कॅरीला फ्रुट किंवा बिटर गार्ड म्हणून ओळखले जाणारे कारले ही वनस्पती कुकरबिटेसी या कुळातील आहे. कारले हिरवट, पांढरसर, काळसर हिरव्या रंगांची आणि पिकल्यानंतर आतून लाल, केशरी होतात. कारली मोठी आणि लहान अशा दोन प्रकारची असतात तर रंगभेदामुळे कारल्याचे पांढरी, हिरवी असेही दोन प्रकार सबंध भारतात आढळतात. कारले सर्व सामान्य आहारामध्ये वापरले जात असले तरी ते एक उत्तम औषध म्हणून वैद्य पाहतात. हल्ली बाजारात मिळणारी हायब्रीड आणि मोठी कारली शक्यतो आहारात वापरू नयेत. भरपूर रेषा असणारी आणि मध्यम आकाराची कारली वापरावीत. औषधी गुणधर्म : आयुर्वेदानुसार कारली पित्तशामक, वातानुलोमक, कृमिघ्न व मूत्रल आहेत. कारल्याची पानेही ज्वरनाशक, कृमीनाशक व मूत्रल आहेत. कारल्यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात तर ‘ब’ जीवनसत्त्व थोडय़ा प्रमाणात असते. या सर्व औषधी गुणधर्मामुळे कारले ही शक्तीवर्धक, पुष्ठीकारक व सारक असल्यामुळे आहाराबरोबरच औषध म्हणूनही वापरतात.

कारल्याचे औषधी उपयोग १) कारले रक्त आणि लघवी मधली साखर कमी करते. वजन वाढलेले आहे आणि मधुमेह आहे अशा लोकांनी आहारात कारले नियमित ठेवावे. कारल्याचा थेट रस कपभर किंवा ग्लासभर घेउ नये. घेतलाच तर जास्तीत जास्त चार ते सहा चमचे एवढाच घ्यावा. तोही कपभर पाण्यात मिसळून घ्यावा.

२) चरबी वाढल्यामुळे होणारे आजार आणि विषबाधा यावर नियमित कारले सेवन करणे हे फार मोठे आणि साधे औषध आहे.

३) अंगाला पिसू सारखे कीटक चावल्याने अंगाची आग होत असेल तर कारल्याच्या पानांचा रस अंगास चोळावा.

४) तोंडाला चव नसेल, भूक लागत नसेल, पचन होत नसेल तर कारल्याची भाजी नियमित खावी.

५) कारले उत्तम रक्तशुद्धी करते त्यामुळे त्वचारोग असणा-या लोकांसाठी ती एक नवसंजीवनी आहे.

६) पाळीच्या विकारात कारले उत्तम असून वेळेवर पाळी येत नसेल किंवा पाळी अचानक बंद झाली असेल तर कारल्याचे नियमित सेवन करावे.

७) रातआंधळे पण असेल तर डोळ्यावर पानांचा लेप लावतात.

८) अंगावर सूज असेल तर कारल्याचा रस सकाळी घेतल्यास फायदेशीर आहे.

९) दमा, सर्दी, खोकला अशा श्वसन मार्गाच्या तक्रारी असतील तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे विकार दूर होतात.

१०) जंत-कृमी झाले असतील तर कारल्यांच्या पानांचा रस कपभर नियमितपणे आठ दिवस द्यावा. यामुळे सर्व कृमी शौचावाटे पडून जातात.

११) आम्लपित्ताचा त्रास होत असेल कारले नियमित सेवन करावे.

१२) कारल्यांच्या पानांचा ३ चमचे रस एक ग्लासभर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो. या सोबत कारल्याची मुळे स्वच्छ धुवून वाटून त्याचा कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीशी होतात.

१३) खरूज, खाज, नायटे, चट्टे अशा त्वचाविकारांवर कारल्याच्या कपभर रसात चमचाभर लिंबूरस घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा. नियमितपणे असा रस घेतल्याने रक्तदोष कमी होऊन रक्तशुद्ध होते व पर्यायाने त्वचा विकार कमी होतात.

१४) मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्यांचे बारीक काप करून ते उन्हामध्ये सुकवून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ, संध्याकाळ ५-५ ग्रॅम (अर्धा चमचा) नियमितपणे घ्यावे. यामुळे साखर नियंत्रणात राहते.

१५) दारू पिणाऱ्या रुग्णांची यकृताची हानी होते. ती हानी भरून काढण्यासाठी व दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्यांच्या पानांच्या रस रोज सकाळ-संध्याकाळ कपभर घ्यावा.

१६) कावीळ या विकारांमध्ये ताज्या कारल्यांचा रस सकाळ-संध्याकाळ प्यावा यामुळे कावीळ दूर होते.

१७) यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस अत्यंत उपयुक्त असतो.

१८) कारल्याच्या पानांचा कल्क, हळद, तीळ तेलात उकळून हे तेल त्वचेला लावल्यास जुने त्वचा विकार तसेच सोरायासीस हा विकार दूर होतो.

१९) स्त्रियांमध्ये बीजांडकोषाला सूज आल्यास कारले बी, मेथी, गुळवेल, जांभूळ बी यांचे चूर्ण करून प्रत्येकी पाच ग्रॅम (अर्धा चमचा) सकाळ-संध्याकाळ घ्यावे.

२०) लघवीस त्रास होत असेल तर कारल्यांच्या पानांचा १ कपभर रस चिमूटभर हिंग घालून प्यावा.

२१) जुनाट ताप (जीर्णज्वर) झालेला असेल तर अशा वेळी कारल्याची पाने वाटून त्याचा रस काढावा व हा रस सकाळी व संध्याकाळी पिण्यास द्यावा.

२२) रातआंधळेपणाचा त्रास होत असेल, तसेच डोळ्यांना क्षीणता आली असेल तर रोज कोवळ्या कारल्यांचा रस किंवा चूर्ण सकाळी संध्याकाळी १-१ चमचा घ्यावे.

त्यात फॉस्फऱस भरपूर असते. कारल्यामुळे कफ कमी होतो. बद्धकोष्ठ बरे होण्यास कारल्याची मदत होते. आहारात त्याचा अंतर्भाव केल्यास जेवण व्यवस्थित पचते. शिवाय भूकही चांगली लागते. दमा असलेल्यांनी मसाला न टाकलेली कारल्याची भाजी खाल्ल्यास फायदेशीर आहे. पोटात गॅस वा अपचन झाल्यास कारल्याचा रस घ्यावा. पक्षाघात झालेल्या रूग्णांना कच्चे कारले फायदेशीर ठरते. उलट्या किंवा जुलाब होत असल्यास कारल्याच्या रसात थोडे पाणी मिसळून, त्यात काळे मीठ टाकून सेवन करावे. लगेचच फरक पडतो. यकृताच्या रोगांसाठी कारले रामबाण औषध आहे. जलोदर झाल्यास किंवा यकृत वाढल्यास अर्ध्या कप पाण्यात दोन मोठे चमचे कारल्याचा रस मिसळावा व रोज बरे होईपर्यंत तीन चार वेळा सेवन करावे. कारले रक्तशुद्धीही करते. मधुमेहाच्या रूग्णांना एक चतुर्थांश कप कारल्याच्या रसात तेवढाच गाजराचा रस मिळवून प्यायला द्यावे. गाठ आल्यास किंवा हातापायांची आग होत असल्यास कारल्याच्या तेलाने मॉलिश करावे. असे हे कारले बहुगुणी आहे. कारल्याच्या सेवनामुळे मुतखडे फुटून ते मुत्राच्या मार्गाने बाहेर पडू शकतात. कारल्यात क्विनाईन असल्याने मलेरियावर ते आहार्य द्रव्य म्हणून वापरण्यात येते. सावधानता : कारल्याचा रस हा अतिशय कडू असल्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात पिणे शक्य होत नाही अशा वेळी खडीसाखर अथवा मध घालून प्यावा. परंतु मधुमेही रुग्णांनी खडीसाखर व मधाचा वापर करू नये. कडू कारल्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे कारले आवडत जरी नसले तरी काही प्रमाणात त्याचा आहारात समावेश करावा.