चर्चा:कंठेरी चिलखा
शीर्षकाबद्दल शंका
[संपादन]या पक्ष्यांच्या प्रजातीचे योग्य नाव 'कंठेरी चिलखा' (वर्तमान शीर्षक) असे आहे की 'कंठेरी चिखला' असे आहे ? मला कुठल्यातरी एका संकेतस्थळावरील पानावर इंग्लिश भाषेत ज्यांना प्लोव्हर(की प्लुव्हर?) म्हणतात, अश्या प्रजातींची मराठी नावे 'अमुकतमुक चिखला' किंवा 'अमुकतमुक चिखली' अशी नोंदवल्याचे स्मरते. कुणी संदर्भ धुंडाळून नेमके नाव तपासू शकेल का ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१०, १४ मे २०११ (UTC)
Plover म्हणून ओळ्खल्या जाणार्या पक्ष्यांना संस्कृतमध्ये खञ्जनिका म्हणतात. या पक्ष्यांचे कुळ Chardriidae. यांमध्ये पॅसिफ़िक गोल्डन प्लोव्हर, ईस्टर्न गोल्डन प्लोव्हर, अमेरिकन गोल्डन प्लोव्हर(सर्वांना मराठीत सोनेरी चिखल्या), कॅस्पियन प्लोव्हर, ग्रेटर सॅन्ड प्लोव्हर, वगैरे वगैरे डझनावारी जाती आहेत. कंठेरी चिखल्या ऊर्फ राजपुत्रिका ऊर्फ सर्शपी, म्हणजेच ज्याचे वर्णन लेखात आले आहे तो लिटल रिंग्ड प्लोव्हर. त्याला चिखल्या म्हणतात, चिलखा, चिखला वगैरे नाही.
याशिवाय अर्धकंठी चिखल्या(Kentish Plover?)(Charadrius alexandrinus) हाहा एक चिखल्या आहे....J १९:०३, १४ मे २०११ (UTC)
- जे, तुम्हांला माहीत असलेले संदर्भ इकडे, तसेच कूलक्रेझी यांच्या चर्चापानावर (कारण त्यांनीही पक्ष्यांविषयी लेखांमध्ये लक्षणीय भर घातली आहे. या पानाची निर्मितीही त्यांचीच) मांडून योग्य ते बदल कराल काय ?
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:०६, १५ मे २०११ (UTC)
कृपया आधी संदर्भ पहावा
[संपादन]कंठेरी चिलखा या लेखाची निर्मिती सदस्य कूलक्रेझी यांची नसून हा लेख मी तयार केला आहे तसेच त्याचा आवाजही मी चढविलेला आहे.
चिलखा हे नाव रिचर्ड ग्रिमेट, टिम इनस्किप, प्रशांत महाजन यांच्या दक्षिण भारतातील पक्षी (मराठी मजकूर), बीएनएचएस फिल्ड गाइड्स, २००५ या पुस्तकातही (पा. क्र. १०८) दिसून येते. मारुती चितमपल्ली यांच्या पक्षिकोश (मराठी मजकूर), साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, मार्च २००२, मध्ये मात्र (पा. क्र. १९१) त्यासाठीचे विदर्भातील नाव टिटवा वापरल्याचे दिसून येईल, पण मी हे नाव मुद्दाम टाळले. gypsypkd (चर्चा) ०७:४८, १५ मे २०११ (UTC)
सतीश पांडे
[संपादन]सतीश पांडे यांच्या Birds of Western Ghats या पुस्तकात पान १०५ते १०७ या पानांवर बर्याच Plovers ची माहिती आहे. त्यांतल्या कंठेरी चिखल्याचे छायाचित्र आणि वर्णन या लेखातल्या चिलखाशी मिळतेजुळते. :J ०९:१३, १५ मे २०११ (UTC)
- चिलखा - 'चिलखाशी' असे रूप न होता 'चिलख्याशी' असे रूप होईल.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३५, १५ मे २०११ (UTC)