चर्चा:एतिहाद एरवेझ
इतिहाद एअरवेज या लेखातील मजकूर येथे समाविष्ट करावा.
अभय नातू (चर्चा) १६:४९, १३ जून २०१६ (IST)
प्रस्तावना
[संपादन]ही यूनायटेड अरब एमिरेटस या देशाची मोठी दुसरे क्रमांकाची झेंडा धारी एयरवेज आहे. यांचे मुख्य कार्यालय अबुधाबी चे आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील खलिफा शहरात आहे. ही विमान सेवा नोवेंबर २००३ मध्ये सुरू झाली.
इतिहास
[संपादन]ही विमान सेवा शेख खलिफा बिन झएद अल नाहयन या अमिरांनी चालू केली.[१] सुरवातीला त्यांनी AED ५०० मिल्लियन भाग भांडवल गुंतवून ही सेवा चालू केली. त्यानंतर १२ नोव्हेंबर २००३ रोजी या कंपनीने बैरुत पर्यन्त व्यावसाईक सेवा चालू केली. त्यापूर्वी गल्फ एयरवेजची अबुधाबीसाठी सेवा चालू होती.
जून २००४ मध्ये या कंपनीने US$ ८ बिल्लियनची विमान खरेदीची ऑर्डर दिली. त्यात 777-300ERs जातीची ५, एयर बस एयर क्राफ्ट २४, त्यात A380-800s चा समावेश होता. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांचेकडे A380 हे पहिले विमान पोहचले. फेब्रुवरी २०१३ अखेर ही विमान कंपनी त्यांचे अबु धाबी बेस येथून पूर्ण जगभर ८६ ठिकाणी प्रवाशी आणि माल वाहतूक विमान सेवा देत होती.
सन २००६ मध्ये या विमान सेवेच्या CEO नि कामकाजाचा एक नियोजित कार्यक्रम आखलेला होता त्यातील यशाने त्यांनी सन २०११ मध्ये विमान कंपनीला या पूर्ण वर्षात US$ १४ मिल्लियन नफा झाल्याचा समाधानाचा अहवाल दिला.[२] इतिहाद विमान कंपनीने युरोपची ६ क्रमांकाची सर्वात मोठी एयर लाइन, की जी एयर बर्लिन, तिचे २९.२१% भाग खरेदी केल्याची डिसेंबर २०११ मध्ये घोषणा केली.[३] आणि जेम्स होगण यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. या भाग खरेदीची पुनरावृत्ती म्हणजे एयर सेयचेल्लेस (४०%), एयर लिंगूस(२.९८७%), व्हर्जिन ऑस्ट्रेलिया, हे भाग खरेदी केले.
१ ऑगस्ट २०१३ रोजी इतिहादचे उपाध्यक्ष जेम्स होगण यांनी सेरबियाचे पहिले उपपंतप्रधान आलेक्स्यंडर वुकिक, यांचेबरोबर बेलग्रेड येथे सेरबियन नॅशनल कॅरियर जेट एयरवेज / एयर सेरबियाचे ४९% भाग खरेदीचे करारावर सही केली. त्यानंतर त्या सरकारकडे ५१% भाग शिल्लक राहीले. या नवीन कंपनीला एयर सेरबिया नाव दिले. सन २०१२ मध्ये इतिहाद एयरलाइनने १०.३ मिल्लियन प्रवाश्यांची वाहतूक केली. ही वाहतूक म्हणजे गत वर्षा पेक्षा २३% जादा होती. सन २०१३ मध्ये दुबई येथे विमान संघाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात स्विस कॅरियर डार्विन एयर लाइनचे ३३.३३% भाग खरेदी केल्याची इतिहादने घोषणा केली. डार्विन एयर लाइन प्रादेशिक इतिहाद असे मार्च २०१४ मध्ये त्याचे बोध चिन्ह झाले. १ ऑगस्ट २०१४ रोजी इटालियन फ्ल्याग कॅरियर अलिटालीयचे ५६० मिल्लियन पाउंडला ४९% भाग खरेदी करण्यास तयार झाले. हा करार ८ ऑगस्ट २०१४ रोजी पूर्ण झाला. त्याने इतिहादचे ४९% भाग आणि अलिटालिय यांचेकडे ५१% भाग राहिले. ऑगस्ट २०१४ मध्य अमेरिकेने इस्लामीक राष्ट्र इराक आणि लेवंटचे कांही भागावर विमान हल्ला केल्याने इतिहाद एयरलाइनने कुर्बिस्तान मधील एरबिल विमान सेवा तात्पुरती स्थगित केली. मे २०१६ मध्ये या कंपनी ने व्यवस्थापनात बदल केला. इतिहाद एविएशन संघाचे एयरलाइन साठी जेम्स होगण यांची CEO म्हणून नेमणूक केली आणि याच इतिहाद मध्ये मुख्य व्यवसाय अधिकारी असणारे पीटर बौमगरटनर यांनी इतिहाद चा CEO म्हणून चार्ज घेतला मात्र त्यांनी प्रत्येक बाबींचा अहवाल होगण यांना देणेचा होता.
प्रवासाची ठिकाणे
[संपादन]सप्टेंबर २०१३ अखेर इतिहाद त्यांच्या एकूण ११६ प्रवाशी व मालवाहतुक विमानाची आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरका, एशिया, औस्ट्रेलिया, या खंडात त्यांच्या अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानातळावरून विमान सेवा देते.[४] इतिहाद एयरवेज एयर चायना, ब्रिटिश एयरवेज, डेल्टा एयरलाइन्स, एमिरेटस, कोरियन एयर, कांतास, कतार एयरवेज, सिंगापूर एयरलाइन्स, साऊथ आफ्रिकन एयरवेज, आणि यूनायटेड एयरलाइन्स यांच्या सहयोगाने ६ उपखंडाना विमान सेवा पुरविते.
कायदेशीर सहयोग करार
[संपादन]इतिहाद एयरवेजने खालील विमान कंपनीशी कायदेशीर व्यवसाय करार केलेले आहेत.
एजियन एयर लाइन्स | अवियंका | केएलम |
ऐर लिंगूस | बँकॉक एयरवेज | कोरियन एयर |
एरो लाइनअस अर्जेंटीनास | बेलविय | मलेशिया एयरलाइन्स |
एयर अस्ताना | ब्रुसेल्स एयरलाइन्स | मिडल पूर्व एयरलाइन्स |
एयर बर्लिन | चायना पूर्व एयरलाइन्स[५] | निकी |
एयर कॅनडा | झेक एयरलाइन्स | पाकिस्तान एयर |
एयर युरोप | डार्विन एयर लाइन्स | फिलिपीन एयरलाइन्स |
एयर फ्रांस | फिजी एयर वेज | रोयल एयर मरोक |
एयर माल्टा | फली बी | एस 7 एयरलाइन्स |
एयर न्यू झीलंड | फ्लाय नास | स्कंडींनावियन एयरलाइन्स |
एयर सेयचेल्लेस | गरुडा इंडोनेशिया | श्रीलंकन एयरलाइन्स |
एयर सेरबिया | गोल लिंहास एरेयस | साऊथ आफ्रिकनयरवेज |
एयर बाल्टिक | हैनन एयर लाइन्स | टॅप पोर्तुगाल |
अलितलीय | हाँग काँग एयर लाइन्स | टर्किश एयर लाइन |
अल्ल निप्पॉन एयरवेज | जेट एयरवेज | व्हिएतनाम एयरलाइन्स |
अमेरिकन एयर लाइन्स | जेट ब्ल्यु एयरवेज | व्हर्जिन औस्ट्रेलिया |
एशियाना एयर लाइन्स | केनया एयर लाइन्स | फ्रेंच एयर वेज |
पुरस्कार
[संपादन]इतिहाद विमान सेवा २००३ पासून सुरू झाली तेव्हापासून या कंपनीला ३० आवार्ड मिळाले. त्यात महत्वाचे म्हणजे :
वर्ष २००९ | वर्ल्ड ट्रव्हल अवॉर्ड (WTA) | बेस्ट ब्यूझिनेस क्लास |
---|---|---|
वर्ष २००९, २०१०, २०११, २०१२ | वर्ल्ड ट्रव्हल अवॉर्ड (WTA) | वर्ल्ड’स लिडिंग एयरलाइन |
वर्ष २०१० | स्कायट्रक्स कडून | वर्ल्ड’स बेस्ट प्रथम वर्ग |
वर्ष २०१० | स्कायट्रक्स कडून | बेस्ट प्रथम वर्ग आहार |
वर्ष २०१० | स्कायट्रक्स कडून | बेस्ट प्रथम वर्ग बैठक सेवा |
वर्ष २०१३ | स्कायट्रक्स कडून | बेस्ट (प्रथम वर्ग २०१३) |
दि.९ जून २०१४ रोजी इतिहादने स्कायट्रॅक्स मधून बाहेर पडत आहे असी घोषणा केली तरीसुद्दा स्कायट्रक्सने २०१५ या वर्षात जगातील पहिल्या ६ विमान सेवेतील इतिहाद कंपनी म्हणून अवॉर्ड दिला. ३ डिसेंबर २०१५ रोजी न्यू यॉर्क शहरात इतिहादची A380 विमानाची विमान सेवा सुरू करताना “एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड’स २०१६ एयर लाइन ऑफ द एअर” ही घोषणा केली.[६]
संदर्भ
[संपादन]- ^ http://www.etihadguest.com/pt/global/about-us/our-story/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.thenational.ae/business/industry-insights/aviation/etihad-airways-lands-first-profit. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.ft.com/intl/cms/s/2a6945f0-2a24-11e1-8f04-00144feabdc0,Authorised=false.html?siteedition=intl&_i_location=http%3A%2F%2Fwww.ft.com%2Fcms%2Fs%2F0%2F2a6945f0-2a24-11e1-8f04-00144feabdc0.html%3Fsiteedition%3Dintl&_i_referer=&classification=conditional_standard&iab=barrier-app#axzz20JAzSPyl. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.cleartrip.com/flight-booking/etihad-airways-airlines.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.arabianbusiness.com/etihad-inks-china-eastern-codeshare-471110.html#.V16LM9bANC0. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.mb.com.ph/etihad-wins-air-transport-worlds-airline-of-the-year-2016-award/. Missing or empty
|title=
(सहाय्य)