चर्चा:ऊष्मागतिकी
Appearance
गतिशास्त्र
[संपादन]गतीशास्त्र लिहिणे चुकीचे आहे. संस्कृतमध्ये ति र्हस्व आहे, त्यामुळे समासापूर्वी ति र्हस्वच राहणार. लेखाचा मथळा बदलून पूर्ववत उष्मागतिशास्त्र असा करायला हवा...J ०७:४३, १७ मे २०११ (UTC)
या पानाचे शीर्षक कसे बदलायचे?
[संपादन]येथे ऊष्मगतिकी असा चुकीचा शब्द लिहीला गेला आहे. ऊष्मागतिकी हा योग्य शब्द आहे. हा मथळा कसा बदलणार?
स्नेहल शेकटकर (चर्चा) २३:०३, १३ जुलै २०१४ (IST)
- लेखाचे संपादन करताना उजवीकडे "इतिहास पहा"च्या शेजारी अधिक असे लिहिलेले असते. यावर टिचकी दिली असता वगळा, स्थानांतरण, इ. दुवे दिसतात. त्यातील स्थानांतरणवर टिचकी देता लेखाचे शीर्षक बदलता येते.
- हे करून पहा व अडचण आल्यास कळवा.
- अभय नातू (चर्चा) २३:०७, १३ जुलै २०१४ (IST)