Jump to content

चर्चा:उनपदेव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उनपदेव-सुनपदेव या पानावरील मजकूर येथे हलविला. निवडक मजकूर लेखात हलवावा.

अभय नातू (चर्चा) १०:५५, २४ जानेवारी २०१४ (IST)[reply]


यावल चोपडा तालुका मार्गावर अडावद पासून अंदाजे 8 ते 10 किलो मीटर अंतरावर सातपुडयाच्या पायथालगत हे स्थान आहे. या ठिकाणी सातपुडयाच्या पर्वतरांगा उंचीने थोडया कमी असल्यासारखे दिसते. उनपदेव सुनपदेव हे पवित्र ठिकाण पौराणिक काळात साधुपुरुषांनी केलेल्या तपाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथील गाईचे दगडीमुख्य कोरलेले असून त्यामधुन वर्षोनुवर्षे गरम पाण्याची धार अहोरात्र पडत आहे. सभोवताली विशाल कुंड असून त्यास तीन बाजुनी पाय-या आहेत. खानदेशातील यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील भावीक कार्तीक महीन्यात आंघोळीकरीता येतात. त्यावेळी तालुक्याच्या ठिकाणावरुन उनपदेव येथे एस.टी.च्या गाडयांची सोयही उपलब्ध असते. विशेष म्हणजे या कुंडाचे भोवताली जुन्या काळातील एक दुमजली इमारत असून ती पुण्यस्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधली असून भावीकांनी मुक्काम करावा हा उददेश असावा जेणे करुन स्वयंपाक करुन राहता येऊ शकेल या उददेशाने बांधली असावी असे वाटते. कुंडा जवळच भुयारात अंदाजे पंधरा फुटावर जमीनीखाली ध्यान धानणा करण्याचे भुयारी स्वरुपाचे रुषी मुनींचे स्थान आहे, त्यामुध्ये अरुंद प्रवेश असून कमरेत वाकुनच जावे लागते. युगेनेयुगेसतत वाहणारा गरम पाण्याचा झरा ईश्वरीसत्तेचे स्वरुप आहे. त्यात कोठलाही बदल झाल्याचे इतिहासात आढळून येत नाही. खानदेशातील एक भेट देण्यास उत्तमस्थळ आहे.