Jump to content

चर्चा:इन्स्क्रिप्ट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवळेकरांनी मुद्देनिहाय दिलेले स्पष्टीकरण योग्य वाटते



इन्स्क्रिप्टमधील दोष

[संपादन]

सदर नोंदीत इन्स्क्रिप्टमधील दोष ह्या सदरात देण्यात आलेल्या माहितीपैकी काही मुद्दे हे यथार्थ नाहीत. कृपया चर्चा करावी.

  • मुद्दा क्र. २ इन्स्क्रिप्टमध्ये पाऊण य असण्यानासण्याचा आणि शीर्षदण्डित व्यंजनांना य जोडून जोडाक्षर करण्याचा काहीएक संबंध नाही. जोडाक्षरे कशी दिसावीत हे टंकांवर अवलंबून असते. इन्स्क्रिप्टवर म्हणजेच आपण अक्षरांचे युनिकोड-संकेत कसे नोंदवतो ह्यावर अवलंबून नसते.
  • मुद्दा क्र. ४ च़, छ़, ज़, झ़ ही अक्षरे इन्स्क्रिप्टात लिहिता येतात. त्यासाठी क + ़ असे टंकावे लागते. मराठीसाठी आवश्यक नसलेली चिन्हे काही कळा अडवून बसली आहेत हे बरोबर आहे.
  • मुद्दा क्र. ६ ऱ्य, ऱ्ह ही अक्षरे इन्स्क्रिप्ट वापरून लिहिता येतात. ऱ (नुक्तायुक्त र (Shift J)) + ् + य/ ह असे टंकून ती लिहिता येतात.
  • मुद्दा क्र. ७ नैर्ऋत्य हा शब्द लिहायला इन्स्क्रिप्टमध्ये काही अ़़डचण नाही. हविर्अन्न, कुर्आन, पुनर्उक्ती, पुनर्उक्ती असे लेखनही मी इथे इन्स्क्रिप्ट वापरूनच केले आहे. काहीच अडचण आली नाही.
  • मुद्दा क्र. ९ शृंगार हा शब्द हवा तसा न दिसणे ही अडचणही इन्स्क्रिप्टची नसून टंकाची आहे. संस्कृत २००३, यशोमुद्रा, एक मुक्त इ. टंक वापरल्यास श + ृ लिहिल्यावर आपोआप शृ हे हवे तसे दिसते.
  • मुद्दा क्र. ८ उभी जोडणी आणि आडवी जोडणी हा मुद्दा पुन्हा टंकांचा आहे. काही टंकांत उभी जोडणी असते. काही टंकांत आडवी जोडणी. काही टंकांत काही अक्षरे एका जोडणीत व काही अक्षरे दुसऱ्या जोडणीत असा प्रकार आहे. रत्नागिरी इ. लेखन त्या त्या टंकानुसार बदलेल. त्याचा इन्स्क्रिप्टशी काहीही संबंध नाही.
  • मुद्दा क्र. १० मराठीसाठी लिहण्यात येणारे शचे वळण हाही मुद्दा इन्स्क्रिप्टचा नसून टंंकांचा आहे. संस्कृत २००३, यशोमुद्रा, सकल मराठी ह्या टंकांत मराठी श दिलेला असतो. एक मुक्त ह्या टंकात तो शैलीभेद म्हणून नोंदवता येतो.

सुशान्त देवळेकर (चर्चा) १४:०४, ३० जुलै २०१६ (IST)[reply]


उत्तर:-

  • इन्स्क्रिप्ट हे टंक नाहीत तर त्याचा कळफलक कसा दिला जातो? InScript (short for Indian Script) is the decreed standard keyboard layout for Indian scripts using a standard 104 or 105 key layout.
  • २. इन्स्किप्ट वापरून पाऊण य टाईप टाईप करता येणारा एखादा टंक दाखवावा.
  • ४. क़, ख़, ग़, ड़, ढ़ टाईप करता येतात, पण च़, छ़, झ येत नाहीत. (ही शेवटची तीन अक्षरे मराठीत आहेत, हिंदीत नाहीत, इन्स्क्रिप्ट बनवण्याचे काम हिंदीभाषकांनी केले आहे, त्यांना मराठीची गरज माहीत असण्याचे कारण नव्हते.
  • ६. ऱ्य, ऱ्ह टाईप करता येतात, हे मान्य. ही अक्षरे मराठीत नाहीत. मराठीत आहेत ती र्‍य आणि र्‍ह (चंद्रकोरीसारखा अर्धा र, आणि त्याला जोडलेला य किंवा र), ती टाईप कतता येत नाहीत.
  • ७. माझ्याकडे जी इन्स्क्रिप्टची आवृत्ती आहे, ती वापरून नैर्ऋत्य, हविर्अन्न, कुर्आन, पुनर्उक्ती, पुनर्उक्ती हे शब्द लिहिता आले नव्हते.
  • ८. टंकांमध्ये उभी जोडणी आणि आडवी जोडणी या दोन्ही सोयी असल्याच पाहिजेत. इन्स्क्रिप्टमध्ये त्या नाहीत, हे सत्य आहे. रत्‍नागिरी हा शब्द रत्नागिरी असा लिहिणे बंद झाले त्याला अनेक वर्षे झाली, इन्स्क्रिटने ही सोय ठेवलीच कशी?
  • १०. शेंडीफोड्या श आणि डौलदार सिमेट्रिक ल हे महाराष्ट्र सरकारने प्रमाणित ठरवले आहेत, त्यांची सोय इन्स्क्रिप्टमध्ये नाही. र ला व जोडून काढायचा ख स्वीकारायला महाराष्ट्र सरकारने अनेक वर्षे खळखळ केली होती. शेवटी इन्स्क्रिप्ट डोक्यावरच बसल्याने तो स्वीकारावा लागला.

संस्कृत २००३, यशोमुद्रा, सकल मराठी ह्या टंकांचा इन्स्क्रिप्टशी काहीही संबंध नाही, हे टंक आधीपासून अस्तित्वात असावेत. इन्स्क्रिप्टचे टंक जर इतके चांगले अ्सतील तर मराठी छापखान्यात ते का वापरले जात नाहीत? इन्स्क्रिफ्टचा जन्म १९८६ साली झाला असला तरी त्यात देवनागरी लिपी होती, मराठी लिपी नव्हती. आजही नसावी. २००८ साली इन्स्क्रिप्टला आजचे रूप मिळाले. मात्र माझ्याकडची इन्स्रिप्टची आवृत्ती जुनी असावी.

इन्स्क्रिप्टच्या साईटवर गेले की फक्त इन्स्क्रिप्ट कळफलकाचीच माहिती असते, म्हणजे इन्स्क्रिप्ट हा केवळ टंक असला पाहिजे.

अनेक वर्षांपूर्वी मला एका कोशवाङ्‌मय सेमिनारला जायला मिळाले होते. त्यावेळी तेथे दिल्लीहून एक इन्स्क्रिप्ट प्रचारक आला होता. त्याने सांगितले की लवकरच देवनागरीमधून जोडाक्षरे संपणार आहेत, आणि फक्त पायमोडकी अक्षरे वापरूनच जोडाक्षरे लिहावी लागणार आहेत. त्याची सुरुवात विद्‌ यालय या शब्दापासून झाल्याचे सेंट्रल स्कूल्सच्या पाट्या पाहिल्या की लक्षात येते. (पायमोडायच्या चिन्हाला मराठी सोडून संस्कृत, पाली आणि अन्य भारतीय भाषांमध्ये ‘विराम चिन्ह’ म्हणतात. अर्थ स्पष्ट आहे, की जेव्हा हे चिन्ह दिसेल तेव्हा क्षणभर विराम घेऊन पुढचे अक्षर उच्चारायचे. त्यामुळे विद्यालय (वि+द्‌+पाऊण य+ल+य) आणि विद्‌‍यालय ह्यांचे उच्चार एकसारखे नाहीत..... (चर्चा) २०:३५, ३० जुलै २०१६ (IST)[reply]



वरील मुद्द्यांबाबतची स्पष्टीकरणे :-

  • इन्स्क्रिप्ट आणि टंक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. युनिकोड संकेत लिपीतल्या प्रत्येक चिन्हाला (स्वर, व्यंजने आणि कानामात्रा इ.) संकेतांक नेमलेला असतो. कळपाटाचे आराखडे ह्या संकेतांकांची कळपाटावरील कळांशी जोडी लावतात. त्यामुळेे ते ते संकेतांक संगणकात नोंदवता येतात. संगणकाच्या पडद्यावर चिन्ह कसे दिसावे ह्याचा ह्या आराखड्याशी थेट संबंध नसतो. पडद्यावर अक्षरे दिसण्यासाठी टंक लागतात. त्यात कोणते संकेतांक असतील तर अक्षरचित्र कसे दिसेल ह्याचे नियम दिलेले असतात. त्यामुळे
    • युनिकोड संकेतांक = लिपिचिन्हांना क्रमांक नेमून देणे
    • कळपाटाचा आराखडा = संकेतांक संगणकाच्या स्मृतीत नोेंदवणे
    • टंक = संगणकात विशिष्ट क्रमाने नोंदवलेले संकेतांक त्याच्याशी संबद्ध नियमांच्या आधारे दृश्य रूपात दाखवणे

ह्या तीन स्वतंत्र गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला हवे.

इन्स्क्रिप्ट हा क्वार्टी (QWERTY) कळपाटाच्या आराखड्यावर देवनागरी आणि इतर भारतीय भाषांचे युनिकोड संकेत बसवलेला आराखडा आहे. एखाद्या तथाकथित फोनेटिक आराखड्यात क्वार्टीवरील k A ह्या कळा दाबून क (U915) आणि ा (U93E) हे युनिकोडसंकेत संगणकात नोंदवण्यात येतात. तर इन्स्क्रिप्टमध्ये त्यासाठी क्वार्टीवरील K e ह्या कळा दाबाव्या लागतात. ह्या दोन्हीत पडद्यावर काय कसे दिसावे ह्याचा काही संबंध नसतो. U915 आणि U93E हे क्रमांक ह्या क्रमाने आल्यावर का ही खूण पडद्यावर उमटवावी ही सोय टंकाच्या आज्ञावलीत असते.

  • यशोमुद्रा हा टंक वापरून शीर्षदण्डित व्यंजनांचा य-शी संयोग करताना पाऊण य दिसतो. तो सुटा टंकलिखित होत नाही. त्याची आवश्यकताही नसते. व्यंजनसंयोगात तो यशोमुद्रा ह्या टंकात व्यवस्थित दिसतो. संस्कृत २००३ ह्यात ळचा अपवाद वगळता पाऊण य दिसतो. एक मुक्त, सकल मराठी ह्यांतही दिसतो.
  • च़, छ़, झ़ मी लिहून दाखवले आहेत. ते असे लिहिण्यात इन्स्क्रिप्टमध्ये कोणतीही अडचण येत नाही.
  • ऱ्य, ऱ्ह ही मराठी अक्षरे नाहीत हा मुद्दा कळला नाही. मी जी लिहून दाखवली आहेत ती तुम्ही म्हणता तशी अर्धचंद्रकोरीसारखा र आणि त्याला जोडलेला य अशीच अक्षरे आहेत. तुम्ही वापरत असलेल्या टंकात ती कदाचित दिसत नसावीत. तुम्ही कोणता टंक वापरता ते कळवले तर मला काय अडचण आहे ते नीट कळू शकेल.
  • टंकामध्ये उभी आणि आडवी असा दोन्ही मांडण्या असायला हव्यात हा मुद्दा मान्य. पण त्यासाठी तितके काम करावे लागते ते आपल्याकडचे टंकविकासक क्वचितच करतात. एक मुक्त ह्या टंकात असे दोन्ही पर्याय दिलेले आहेत. ते शैलीभेद निवडला की वापरता येतात. पण त्याचा इन्स्क्रिप्टशी काही संबंध नाही. टंकात सोय असेल तर इन्स्क्रिप्ट वापरून ती ती मांडणी वापरता येते.
  • श आणि ल हाही मुद्दा टंकाचाच आहे हे कृपया लक्षात घ्यावे. त्याचा इन्स्क्रिप्टशी काहीही संबंध नाही. युनिकोडमध्ये श आणि ल ह्यांना संकेतांक दिले आहेत. तो श शेंडीफोड्या दिसेल की गाठीचा हे टंकावर अवलंबून असते. इन्स्क्रिप्ट किंवा अन्य कोणताही कळपाटाचा आराखडा केवळ तो संकेतांक संगणकात नोंदवतो, त्या संकेतांकासाठी कोणते चित्र दाखवायचे हे टंकावर अवलंबून असते.
  • संस्कृत २००३ हा टंक २००३ मधला आहे, सकल मराठी २०१३ किंवा २०१४ मधला आणि यशोमुद्रा २०१५ मधला आहे. इन्स्क्रिप्ट आणि टंक ह्या वेगळ्या गोष्टी असल्याने इन्स्क्रिप्टचा टंक अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही.
  • इन्स्क्रिप्टची साईट असे म्हणताना आपल्याला कोणते संकेतस्थळ अभिप्रेत आहे? माझ्या माहितीप्रमाणे इन्स्क्रिप्टचे असे कोणतेही संकेतस्थळ नाही.
  • हिंदीत जोडाक्षरे कशी दिसतात हा पूर्णतः वेगळा मुद्दा आहे. तोडाक्षराची पद्धत आपल्याकडे बालभारतीनेही अवलंबलेली आहे, पण ही पद्धत चुकीची आहे असेच माझेही मत आहे. इथेही इन्स्क्रिप्टचा काहीही संबंध नाही.

--सुशान्त देवळेकर (चर्चा) २३:४२, ३० जुलै २०१६ (IST)[reply]


>>तोडाक्षराची पद्धत आपल्याकडे बालभारतीनेही अवलंबलेली आहे<<

बालभारतीने जेव्हा ही पद्धत वापरली तेव्हा संगणक-छपाई नव्हती. सर्व लिखाण टाईपरायटर करावे लागे. द्वंद्व हा शब्द बालभारतीच्या पुस्तकांत द्‌वंद्‌व असा दिसे, आणि तो तसाच कसा बरोबर आहे हे बालभारतीचे अधिकारी हिरिरीने मांडत. ... (चर्चा) ००:००, ३१ जुलै २०१६ (IST)[reply]