चर्चा:आर्जेन्टिना
अर्जेंटीना vs आर्जेंटिना
Which spelling is right? I have Argentinian friends that pronounce it as आर्जेंटिना. Can someone confirm?
अभय नातू 14:26, 9 ऑगस्ट 2006 (UTC)
गूगल सर्च - अर्जेंटिना; रूढ लेखन
[संपादन]अभय,
तुम्ही म्हणता ते कदाचित खरं असेल. मला वृत्तपत्रांत 'अर्जेंटिना' असं च्हापलं जात असल्याचं स्मरतं. मी गूगलवरही शोधून पाहिलं. त्यात मराठी वेबपानांवर 'अर्जेंटिना' असं लिखाण जास्तकरून आढळलं. 'आर्जेंटिना' हे लेखन गूगलवर शोधलं असता हिंदी शोधपरिणाम जास्त संख्येत आढळले.
संकल्प द्रविड 18:33, 9 ऑगस्ट 2006 (UTC)
- हिंदीतील उच्चार ईंग्लिश किंवा स्थानिक भाषेशी सुसंगत असत नाहीत असे माझे मत आहे. उदा. हिंदीत सगळे ऑ उच्चार औ होतात, जसे ब्लौग, जौन, इ.
- ततः हिंदी उच्चारांपेक्षा स्थानिक भाषेतील उच्चारास जास्त महत्त्व द्यावे असे मला वाटते.
- येथे आर्जेन्टीनाचा उच्चार Main Entry मथळ्याखाली आहे.
अभय नातू 19:08, 9 ऑगस्ट 2006 (UTC)
Buenos Aires चे लेखन
[संपादन]आणखीन एक प्रश्न: Buenos Aires चे लेखन कसे करावे?
- ब्युनोस आयर्स
- ब्यूनोस आयर्स
- ब्युनॉस आयर्स
- बोयनोस एर्स
मला क्र. ३ चं लेखन 'सकाळ' वगैरे वृत्तपत्रांत वाचल्याचं स्मरतंय. परंतु मी या लेखाच्या आधीच्या आवृत्तीत असलेलं क्र. ४ च्या पद्धतीने केलेलं लेखनच या आवृत्तीत तसंच ठेवलं आहे.
संकल्प द्रविड 18:39, 9 ऑगस्ट 2006 (UTC)
- संकल्प,
- बोयनोस एर्स/एरिस, आर्जेन्टीना, इ. उच्चार मी स्थानिक (आर्जेन्टीनीयन) लोकांकडून ऐकलेले आहेत.
येथे बोयनोस एर्स/एरिसचा उच्चार .wav fileमध्ये आहे. अभय नातू 19:03, 9 ऑगस्ट 2006 (UTC)