चर्चा:आडनाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Untitled[संपादन]

सुर्य पूर्वेस उगवतो हे जसे सर्वमान्य सत्य आहे या नियमानुसार निसर्गाशी संबंधित आडनावांना संदर्भ द्यायची खरोखरीच गरज आहे काय? ती कपोलकल्पित नाहीत.रुढ आहेत. वि. नरसीकर (चर्चा) ०४:०६, १४ डिसेंबर २००९ (UTC)

त्या विधानाच्या पुष्ट्यर्थ एखाद्या पुस्तकाचा किंवा तत्सम माहितीपर स्रोताचा संदर्भ द्यावा असे मला वाटते. कारण 'डोंगरे' हे आडनाव 'डोंगर' या निसर्गघटकावरून पडले की 'डोंगरी' नावाच्या मूळगावावरून पडले, अशा शंका उद्भवू शकतात. 'शिखरे' हे आडनाव 'शिखर' (शिंगणापूरवाले किंवा माहुर परिसरातले, दोन्हींपैकी कुठलेही 'शिखर' तीर्थक्षेत्र) तीर्थक्षेत्रावरून आले की 'शिखर' या भौगोलिक संज्ञेवरून, हीद्खील शंका ग्राह्य नाही का? इतर काही आडनावांबद्दलही शंका आहेत :
 • बोरकर हे 'वनस्पती/धान्याशी संबंधित' आडनाव असण्याला काही संशोधनसंदर्भ मिळाला तर उत्तम. कारण, हे आडनाव 'बोरी' या मूळगावावरून 'बोरीकर' व अपभ्रष्ट रूपात 'बोरकर' पडले असण्याची शक्यता सहजासहजी नजरेआड सारता येत नाही.
 • जांभळे हे आडनाव 'जांभळ्या रंगा'वरून पडले की 'जांभूळ' फळावरून पडले की अन्य काही कारणाने पडले?
थोडक्यात, आडनावांच्या स्रोतांविषयी विश्वासार्ह संदर्भ मांडता आले, तर सध्या आहे तसे सूक्ष्म वर्गीकरण ठेवावे. अन्यथा 'निसर्गाशी संबंधित' इतपत ढोबळ वर्गीकरणापुरते सीमित ठेवावे. तसेच शंकातीत अशी मोजकीच आडनावे उदाहरणादाखल ठेवावी. इतर आडनावांसाठी चित्पावन आडनावांची यादी या लेखाप्रमाणे स्वतंत्र यादीपर लेख बनवावेत, असे मी सुचवतो.
ता.क. : आडनाव लेखातील माहितीची व्याप्ती, स्वरूप व मांडणी यासाठी वानगीदाखल en:Surname हा लेख पाहण्याजोगा आहे.आडनावांच्या याद्यांसाठी इंग्लिश विकिपीडियावरही स्वतंत्र यदीपर लेख व चपखल वर्ग वापरले आहेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:२७, १४ डिसेंबर २००९ (UTC)

निसर्गाशी संबंधित[संपादन]

नाव आणि वडिलांचे नावाच्या योगायोगाने साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टाळण्यासाठी आडनावाची संकल्पना पुढे आली असावी असा माझा समज आहे.पूर्वी,कुटुंबे मोठी रहात असत.एका एका घरी १०-१०,१२-१२ अपत्ये.त्यातच व्याही दोघेही 'शंकरराव'. मग,सुगृहिणी, त्यांच्यात योग्य भेद 'शंकरराव सायखेडकर आले होते' वा 'शंकरराव पुणेकर आले होते' असा करून पतीस वर्तमान कळवित असत. यावरुनच आडनावांची संकल्पना उदयास आली असावी असा माझा समज आहे.त्यात थोडा वेगळेपणा दाखविण्यासाठी डोंगरावर राहणारे ते डोंगरे.ज्यांनी वाघ मारीला ते वाघमारे. वगैरे संकल्पना पुढे आल्या असाव्यात.भारतात, दक्षिणेकडे हा भेद नावासमोर गावाच्या नावाचे आद्याक्षर लावुन करतात. अर्थात, हे एक माझे वैयक्तिक चिंतन आहे.

कोणी आडनावांवर संशोधन केले असल्याचे माहित नाही.तरीपण शोधतो.त्यास वेळ लागेल.

या सर्व गोष्टी अतिशय पुरातन कालापासुन घडत आल्यामुळे,त्याचा कोणी record न ठेविल्यामुळे त्यांची व्युत्पत्ती शोधुन काढणे अवघडच आहे. त्यातुनच 'भाट' ही संकल्पनाही नामशेष होत आली आहे. हे लोकं पिढयानपिढ्या अनेक कुटुंबांचा record ठेवित असत असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. त्यावरुनच, आपले पूर्वज कोण, ते अमुक देवस्थानात कधी आले होते वगैरे माहिती मिळत असे. आता, हे मिळणे दुरापास्तच आहे. ह्याला आपला समाजच जबाबदार आहे व तेवढेच आपणही. अनेकांना आपल्याच पणजोबांचे,खापरपणजोबांचे नावपण माहित नाही तर आडनाव कसे पडले हे कुठुन माहित होणार?

इंग्रजी विकिपिडिया बघण्याची मलातरी गरज वाटत नाही.त्यांचे १००% अनुकरण नको म्हणुन.साचा,नियम इत्यादी साठी बघणे ठिक.आपल्या मराठीच्या वेगळ्या संकल्पना आहेत.त्याचे वेगळेपण जपायला हवे. पण आपण सुचविले आहे म्हणुन बघतो.'बाबा वाक्यम् प्रमाणम्' असे करण्याची गरज नाही असे माझे मत आहे. असो.

यावर मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.मी आपला आभारी आहे. या लेखात कोणत्याप्रकारे बदल करावेत ते कृपया सुचवावेत. ते करतो.आडनावे catagorise करण्याचा हा एक प्रयत्न होता.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:११, १४ डिसेंबर २००९ (UTC)

नेमकेपणा[संपादन]

>>> इंग्रजी विकिपिडिया बघण्याची मलातरी गरज वाटत नाही.त्यांचे १००% अनुकरण नको म्हणुन.साचा,नियम इत्यादी साठी बघणे ठिक.आपल्या मराठीच्या वेगळ्या संकल्पना आहेत. <<<

मीही इंग्लिश विकिपीडियाची १००% नक्कल करण्याचा मुद्दा मांडला नाहीये. मी उदाहरण दिले, ते मात्र तुम्ही हे मुद्दे लक्षात घ्यावे म्हणून :

 1. आडनाव हा लेख 'आडनाव' संकल्पनेची माहिती विषद करणारा असावा; यादी-स्वरूपाचा होऊ नये. यात मराठी आडनावांच्या जोडीने जगभरातील आडनावांच्या संकेतांमागची प्रातिनिधिक, संक्षिप्त स्वरूपाची माहिती असावी : म्हणजे, उगम/ व्युत्पत्तीचे विशिष्ट प्रकार (जसे तुम्ही मांडलेत, थोड्या-फार फरकाने तसेच, पण मोजकी प्रातिनिधिक उदाहरणे घेऊन), क्रम, आडनावे लावायच्या रीती इत्यादी. मराठी आडनावांवर यथायोग्य भर देण्यासाठी मी अगोदरच लेखात स्वतंत्र विभाग केला आहे. त्याच्या जोडीनेच या लेखात इतर संस्कृतींमधील 'आडनाव' संकल्पनेची माहिती यायला हवी.
 2. आडनावांची जंत्री करण्यासाठी 'यादी' स्वरूपाचे स्वतंत्र लेख लिहावेत; जसे : चित्पावन आडनावांची यादी. प्रस्तुत मूळ लेखात 'हेही पाहा' नावाच्या विभागात अशा यादीपर लेखांचे दुवे डकवता येतील. याशिवाय, एकेका आडनावाबद्दल पुरेशी माहिती असल्यास स्वतंत्र लेख लिहिणे शक्य आहे; मात्र त्यासाठी त्या विशिष्ट आडनावाबद्दल खालीलपैकी किमान काही प्रकारांतील वैश्वकोशीय माहिती संकल्पित लेखात नोंदवता यायला हवी :
  • आडनावाचा आढळ कुठे (कुठल्या भाषिक / वांशिक समूहांमध्ये) आहे, याबद्द्ल माहिती
  • आडनावाचा उगम / व्युत्पत्ती
  • आडनाव भारतीय उपखंडातील समूहांतले असल्यास, त्या आडनावाची जात / पोटजातींतल्या आढळाची माहिती (उपखंडातली काही आडनावे विविध जाती-पोटजातींमध्ये, भाषिक समूहांमध्ये सामायिक आहेत.)
  • अन्य संस्कृतींमधील आडनाव असल्यास, त्या आडनावाची त्या-त्या संस्कृतीनुरूप असणारी वैशिष्ट्यपूर्ण माहिती (उदा. : स्कॉटिश आडनावांमध्ये प्रत्येक कुळनावाची स्वतंत्र चिन्हे, कोट-ऑफ-आर्म आहेत.)
  • त्या आडनावाच्या प्रसिद्ध व्यक्तींचे लेख मराठी विकिपीडियावर असतील, तर त्यांच्या अंतर्विकि दुव्यांची यादी

प्रस्तुत लेख लिहिताना तुम्ही या बाबी लक्षात घ्याव्यात अशा उद्देशाने इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचा दाखला दिला होता. आतादेखील तुम्हांला प्रस्तुत लेख किंवा संबंधित लेख लिहिताना हे मुद्दे उपयोगी पडतील, या आशेने मागच्याच पोस्टीतले मुद्दे विस्ताराने विवरले आहेत.

बाकी, मी काही मराठी आडनावांबद्दल स्वतंत्र लेख लिहीत आलो आहे. ते लेख वर्ग:मराठी आडनावे या वर्गामध्ये वर्ग केले आहेत. त्या लेखांतही आपण योगदान द्याल, अशी आशा वाटते.

>>> अनेकांना आपल्याच पणजोबांचे,खापरपणजोबांचे नावपण माहित नाही तर आडनाव कसे पडले हे कुठुन माहित होणार? <<<

भाट/पंडे, वंशावळ व तदनुषंगिक माहिती स्वरूपातला सांस्कृतिक, समाजशास्त्रीय ठेवा यांबद्दलच्या आपल्या भावनांशी मी सहमत आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:४९, १४ डिसेंबर २००९ (UTC)

दोघांशीही सहमत (इंग्लिश विकिपीडियाचे अंधानुकरण नको तसेच तेथील चांगल्या गोष्टी उचलाव्यात).
संकल्पच्या नेमकेपणाबद्दलच्या सूचनांमध्ये अधिक काही --
आडनावाचा आढळ कुठे (कुठल्या भाषिक / वांशिक समूहांमध्ये) आहे, याबद्द्ल माहिती...आडनाव भारतीय उपखंडातील समूहांतले असल्यास, त्या आडनावाची जात / पोटजातींतल्या आढळाची माहिती (उपखंडातली काही आडनावे विविध जाती-पोटजातींमध्ये, भाषिक समूहांमध्ये सामायिक आहेत.)
१. यात हा आढळ सहसा आहे हे प्रत्येक ठिकाणी जरुर लिहावे - एकच आडनाव अगदी भिन्न भाषिक/वांशिक समूहांमध्ये आढळते, उदा. काळे, आंबेडकर, साठे, इ.
२. प्रसिद्ध व्यक्तींचे आडनाव मातृजन्य (Maternal) असल्यास त्याचा उल्लेखही करावा. स्पॅनिश मुले आईचे व वडीलांचे (याच क्रमाने) अशी दोन्ही आडनावे लावतात व एकच लावणे शक्य असल्यास सहसा आईचे लावतात. जगातील अनेक समूहांत (मला वाटते काही भारतीय वांशिक समूहांतही) आईचेच आडनाव पुढे येते. काही स्लाव्ह वंशगटांत मुली आईचे माहेरचे आडनाव लावतात तर मुले वडीलांचे.
अभय नातू १७:५८, १४ डिसेंबर २००९ (UTC)