Jump to content

चर्चा:अस्‌-सलामु-अलयकुम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Abuse filter लावल्याबद्दल

[संपादन]

"अस्‌-सलामु-अलयकुम" चा अर्थ "तुमच्यावर शांतता नांदो" असा होतो. अशी ओळ मी ह्या लेखात जोडली. पण त्यातल्या "तुमच्यावर" ह्या शब्दामुळे filter चा असा गैरसमज झाला की मी लिखाण तृतियपुरुष म्हणून नाही करत आहे. मला तशी ताकिद देखिल मिळाली. मग मी दुरुपयोग न करताही माझी नोंद झाली. ह्याचा माझ्या अधिकारांवर प्रभाव पडू नये ह्याची कृपया काळजी घ्यावी. सिद्धांत सुरेश सीमा (चर्चा) १२:२७, १७ मे २०१२ (IST)[reply]

लेखांचे संपादन करत असताना शक्यतो तृतीयपुरूषी लेखन अपेक्षित असते. आणि आपण जर चुकीने प्रथम, द्वितीयपुरूषी लेखन केलेले असेल तर लेख जतन करतेवेळी आपल्याला तशी सूचना केली जाते. (काही वेळा प्रथम, द्वितीयपुरूषी लेखनही लेखात आवश्यक असते. पण तरीही ते आपण पुन्हा तपासावे म्हणून विनंतीवजा सूचना केली जाते.) ही सूचना म्हणजे Abuse filter त्यावेळी कार्यान्वित होऊन आपल्याला अशी सूचना दिली जाते. मग आपण आवश्यक असेल तर बदल करावेत व आवश्यक नसल्यास तसाच लेख जतन करावा. लेख जतन केल्यानंतर त्याची फक्त नोंद ठेवली जाते व त्याला "प्रथम-द्वितीय पुरुष--लेखन तृतीयपुरूषात बदला" असा टॅग जोडला जातो. याचा आपल्या सदस्य अधिकारावर काहीही परीणाम होत नाही.
-संतोष दहिवळ (चर्चा) १८:०९, १७ मे २०१२ (IST)[reply]
नमस्कार, सिद्धांत सुरेश सीमा ,प्रथमत: मनमोकळा प्रतिसाद देण्या बद्दल धन्यवाद, आपल्या प्रतिसादांमुळ्चे सुयोग्य सुधारणा करण्यास दिशा मिळते.फिल्टर्स यांत्रीक गोष्ट आहे त्यास मर्यादा आहेत याची मला निश्चित पणे जाणीव आहे .मराठी विकिपीडीयावर फिल्टर्स आणि सूचना अभ्यास करून अद्ययावत करण्याचे काम अद्याप चालू आहे. सूचनेतील सध्याच्या उणीवांमूळे आपला गैरसमज झाला असल्यास मी आपला क्षमाप्रार्थी आहे.मी जे सूचना संदेश तयार करतो त्यांचे स्वरूप संकेतांच्या मार्गदर्शनाचे असते , मी नियम ताकीद वगैरे शब्द माझ्या शब्दकोशात कमीत कमी वेळा वापरतो.
व्यक्तिगत पातळीवर कुणावरही चुकीने अन्याय होणार नाही म्हणून मी पुरेपुर दक्षता घेत असतो. काळजी करू नये. सदस्य संतोष दहिवळांनी दिलेला प्रतिसाद योग्यच आहे. आणि संतोषना सुद्धा सहाय्य प्रतिसाद देण्याकरिता धन्यवाद.
आपल्या आवडीचे लेखन आणि वाचन सदैव घडत राहो हि शुभेच्छा . माहितगार (चर्चा) १९:४६, १७ मे २०१२ (IST)[reply]
सर्वप्रथम, एवढ्या तातडीने व सविस्तर उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद! स्वयंचलनामधल्या उणीवांमुळे घडलेल्या गैरसमजाबद्दल क्षमस्व.
परिक्षा नुकतीच आटोपली. ह्या सुट्टीत, मराठी विकिपीडियावर अस्तित्वात नसणार्‍या लेखांचे संपादन करायचे (कमीतकमी सुरुवात करून ठेवायचे) ठरवले आहे. :)
धन्यवाद! सिद्धांत सुरेश सीमा (चर्चा) ००:०४, १८ मे २०१२ (IST)[reply]