अस्‌-सलामु-अलयकुम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg हे पान अनाथ आहे.
जुलै २०१३च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.

अस्‌-सलामु-अलयकुम (السلام عليكم) हे जगभरातल्या मुसलमान समुदायाच्या लोकांनी वापरले जाणारे अभिवादन आहे. ह्याचा शब्दशः अर्थ “तुमच्यावर शांतता नांदो” असा होतो, पण ह्याला मराठीतल्या “नमस्कार” किंवा “शुभदिवस” च्या अर्थाने वापरले जाते.

अपभ्रंश[संपादन]

भारतात ह्या अभिवादनाचा अपभ्रंश झालेला आढळतो व मूळ उच्चारापेक्षा वेगळा उच्चार केला जातो. भारतात ह्याला सहसा “अस्सलाम-वालेकुम” किंवा “स्सलाम-वालेकुम” असे उच्चारले जाते. ह्याचेच संक्षिप्त व धर्मनिरपेक्ष रूप “सलाम” असे आहे.

प्रतिअभिवादन[संपादन]

ह्या अभिवादनाला प्रतिअभिवादन वा-अलयकुम-अस्-सलाम असे केले जाते.