चर्चा:अमरकोश

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमरकोशाचे उद्दिष्ट[संपादन]

@: अमरकोशाचे मुख्य उद्दिष्ट संस्कृत भाषेतील नामांच्या लिंगांची माहिती देणे हे आहे. समानार्थी शब्दांची माहिती देणे हे मुख्य उद्दिष्ट नाही. तो रचनेमुळे जमून आलेला आनुषंगिक भाग आहे. समानार्थी शब्दांचे गट लिंगांची माहिती देण्याच्या सोयीसाठी केलेले आहेत. ह्याला प्रमाण म्हणून अमरकोशाच्या आरंभी आलेले कोशाचे स्वरूप समजावून सांगणारे श्लोक पाहावे.

प्रायशः रूपभेदेन साहचर्याच्च कुत्रचित् स्त्रीपुंनपुंसंकं ज्ञेयं तद्विशेषविधे क्वचित्

ह्या श्लोकात जाणावे ह्या अर्थी ज्ञेयं हे पद आले आहे. काय जाणावे? स्त्रीपुंनपुंसकं हा भेद. त्यासाठी बहुतेक ठिकाणी रूपभेद दाखवला आहे. काही ठिकाणी साहचर्याने तो भेद समजून घ्याचा आहे आणि क्वचित् प्रसंगी लिंगाचा विशेष उल्लेख करून भेद दाखवलेला आहे. ह्यात लिंगाविषयी माहिती देणे हे ह्या कोशाचे उद्दिष्ट आहे हे स्पष्ट आहे.

उदा. अमरकोशातील स्वर्गवर्गातील पहिला श्लोक पुढीलप्रमाणे आहे.

स्वरव्ययं, स्वर्ग-नाक-त्रिदिव-त्रिदशालयाः सुरलोको, द्यो दिवै द्वे स्त्रियां, क्लीबे त्रिविष्टपम्

ह्या श्लोकात स्वर्ग ह्या अर्थाचे स्वर्, स्वर्ग, नाक, त्रिदिव, त्रिदशालय, सुरलोक, द्यो, द्यौ, त्रिविष्टप् हे ९ शब्द आहेत. त्यांपैकी स्वर् हा शब्द अव्यय आहे. म्हणजे त्याला लिंगविकार होत नाहीत. स्वर्ग ते त्रिदशालय हे ४ शब्द त्रिदशालय ह्या शब्दाचे जे अनेकवचनी रूप वापरले आहे त्याच्या साहचर्याने पुल्लिंगी आहेत हे समजायचे आहे. सुरलोको ह्यात तो शब्द पुल्लिंगी आहे हे रूपभेदावरून सांगितले आहे. द्यो आणि द्यौ हे दोन शब्द स्त्रीलिंगी आहेत आणि त्रिविष्टप् हा शब्द नपुंसकलिंगी आहे हे विशेष स्पष्टीकरण देऊन सांगितले आहे.

अमरकोशाच्या तिसऱ्या कांडात विशेष्यनिघ्न शब्द म्हणजे ज्यांचे लिंग विशेष्यानुसार ठरते त्यांची म्हणजे विशेषणांची माहिती येते. ह्या सगळ्यावरून अमरकोशाचे उद्दिष्ट शब्दांच्या लिंगांची माहिती देणे हे आहे हे स्पष्ट आहे. त्याचे नावच मुळी नामलिङ्गानुशासन असे आहे. सुशान्त देवळेकर (चर्चा) २३:००, १ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

अमरकोशाच्या प्रस्तावना[संपादन]

अमरकोशावर अनेकांनी टीका ग्रंथ लिहिले आहेत, त्यांपैकी ’चौखंबा’ने प्रकाशित केलेला मणिप्रभा टीकाग्रंथ माझ्यासमोर आहे. या ग्रंथाचे नाव देतानाच मोठ्या अक्षरामध्ये अमरकोश असे लिहून त्याखाली छोट्या अक्षरात आणि कंसात नामलिंगानुशासनम्‌ असे शब्द आहेत. प्रस्तावनेत म्हटले आहे निघण्टु तसेच निरुक्त आदी कोशांत वेदांतील कठीण शब्दांची जंत्री होती. शब्दद्रुमकोष, मेदिनीकोष वगैरेंमध्ये फक्त नामवाचक शब्दांची माहिती होती. (असे सुमारे २०० कोश आहेत) शब्दांबरोबर त्याचे लिंग सांगणार्‍या कोशाची गरज अमरकोशाने पुरी केली. आजही कोणत्याही आधुनिक कोशात शब्द दिल्यानंतर कंसात त्याचे व्याकरण देतात. अमरसिंहाने हीच पद्धत वापरली. प्रस्तावनेत मला असे एकही वाक्य सापडले नाही की ज्याच्यावरून हा शब्दकोष नसून लिंगकोष आहे असे सिद्ध होईल.. असे असते तर अमरसिंहाने तीन लिंगांसाठी तीन खंड करून त्यात नामे भरली असती.

एवंच हा नामकोश (Thesaurus)च आहे, नामाच्या अनुषंगाने त्या शब्दाचे लिंग दिले आहे म्हणून नाम‍लिंगानुशासनम्‌ हे नाव कंसात येते..आधी नाम आणि मग त्याचे लिंग!.. (चर्चा) २३:५२, १ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]