Jump to content

चक्रफूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चक्रफूल आणि बी

चक्रफूल (शास्त्रीय नाव: Illicium verum) ज्याला इंग्रजी भाषेत Star anise, star aniseed, किंवा Chinese star anise असेही म्हणतात, व्हियेतनाम आणि दक्षिण चीनमध्ये वाढणारी एक वनस्पती आहे.[१][२]

चक्रफूलाचे आकार षट्कोन व अष्टकोनीय तारासारखे दिसतात

वापर[संपादन]

दक्षिण भारतीय पाककृतीमध्ये चक्रफूल गरम मसाला , मसाला, चहा मसाला इ. या मिश्रण मसाल्याचे पदार्थ बनवण्यासाठी वापर केला जातो.[१]

चक्रफूलाचा वापर पुलाव ,बिर्याणी इ. या खाद्यपदार्थमध्ये सुगंधि व चव येण्यासाठी वापरले जाते. तसेच चिनी पाककृती ,मलय आणि इंडोनेशियन पाककृतींमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. चीन, भारत आणि आशिया खंडातील बहुतेक इतर देशांत व्यावसायिक उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चक्रफूल हे चिनी पाककृतींमध्ये पारंपारिक पाच मसाल्यांच्या पावडरचा एक घटक पदार्थ आहे. व्हियेतनामी नूडल सूप, phở बनवण्यामध्येही उपयोग केला जातो.[१]

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ a b c "Illicium verum". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-09.
  2. ^ "चक्रफूल". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-12.