चंद्रा क्ष-किरण वेधशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंद्रा क्ष-किरण वेधशाळा
Chandra X-ray Observatory
चंद्रा दुर्बिणीचे नावांसहीत चित्र
साधारण माहिती
एनएसएसडीसी क्रमांक १९९९-०४०बी
संस्थानासा / एसएओ / सीएक्ससी
सोडण्याची तारीख २३ जुलै, १९९९
कुठुन सोडली केनेडी अंतराळ केंद्र
सोडण्याचे वाहन कोलंबिया अंतराळयान
प्रकल्प कालावधी नियोजित: ५ वर्षे
पश्चात: &0000000000000024.000000२४ वर्षे, &0000000000000308.000000३०८ दिवस
वस्तुमान४,७९० किलो (१०,५६० पौंड)[१]
कक्षेचा प्रकार भूकेंद्रीय कक्षा
कक्षेची उंची अर्धदीर्घ अक्ष: ८०,७९५.९ किमी (५०,२०४.२ मैल)
उत्केंद्रता: ०.७४३९७२
अपसूर्य बिंदू: १,३४,५२७.६ किमी (८३,५९१.६ मैल)
उपसूर्य बिंदू: १४,३०७.९ किमी (८,८९०.५ मैल)
कक्षेचा कालावधी ३८०९.३ मिनीटे
फिरण्याचा वेग ०.३७८० प्रदक्षिणा/दिवस
दुर्बिणीची रचना वोल्टर दुर्बीण[२]
तरंगलांबीक्ष-किरण (०.१ - १० keV)[२]
व्यास१.२ मी (३.९ फूट)[१]
एकूण क्षेत्रफळ ०.०४ मी (०.४३ चौ. फूट)[१]
फोकल लांबी १०.० मी (३२.८ फूट)[१]
उपकरणे
ACIS Advanced CCD Imaging Spectrometer
HRC High Resolution Camera
HETG High Energy Transmission Grating
LETG Low Energy Transmission Grating
संकेतस्थळ
chandra.harvard.edu

चंद्रा क्ष-किरण वेधशाळा (Chandra X-ray Observatory) ही कृत्रिम उपग्रहाच्या स्वरूपातली एक अवकाशीय वेधशाळा आहे. २३ जुलै १९९९ रोजी एसटीएस-९३ मोहिमेमध्ये नासाच्या कोलंबिया अंतराळयानाने हिचे प्रक्षेपण करण्यात आले होते. ६४ तासामध्ये ही वेधशाळा पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करते. या वेधशाळेमध्ये एक क्ष-किरण दुर्बीण आहे. तिच्यातील आरशांच्या उच्च कोनीय विभेदनामुळे ती तिच्यापूर्वीच्या इतर कुठल्याही क्ष-किरण दुर्बिणीपेक्षा १०० पटींनी जास्त संवेदनशील आहे. पृथ्वीचे वातावरण बहुतांश क्ष-किरणे शोषून घेते. त्यामुळे जमिनीवरील दुर्बिणींनी क्ष-किरणांचे निरीक्षण करता येत नाही. म्हणून अवकाशीय वेधशाळेची गरज भासते. ही दुर्बीण सध्या (२०१६ मध्ये) कार्यरत आहे.

चंद्रा वेधशाळा नासाच्या चार महान वेधशाळांमधील तिसरी वेधशाळा आहे. यामधील सर्वात पहिली हबल दुर्बीण, दुसरी इ.स. १९९१ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेली कॉम्प्टन गॅमा किरण वेधशाळा आणि चौथी स्पिट्झर अवकाश दुर्बीण आहे.

चंद्रा या दुर्बिणीचे नाव भारतीय-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे.[३]

चित्रदालन[संपादन]

चंद्रा दुर्बिणीने घेतलेली काही छायाचित्रे

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d "Chandra Specifications" (इंग्रजी भाषेत). September 3, 2015 रोजी पाहिले.
  2. ^ a b "The Chandra X-ray Observatory: Overview" (इंग्रजी भाषेत). September 3, 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "And the co-winners are..." (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2014-01-12. January 12, 2014 रोजी पाहिले.
  4. ^ Chou Felicia, Anderson Janet, Watzke Megan. "RELEASE 15-001 - NASA's Chandra Detects Record-Breaking Outburst from Milky Way's Black Hole" (इंग्रजी भाषेत). January 6, 2015 रोजी पाहिले.