चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंद्रशेखर (कवी) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे तथा कवी चंद्रशेखर (२९ जानेवारी, इ.स. १८७१:नाशिक, महाराष्ट्र, भारत१७ मार्च, इ.स. १९३७:वडोदरा, गुजरात) हे मराठी कवी होते. यांचे शिक्षण नाशिक, वडोदरा आणि पुणे येथे झाले. त्यांनी वडोदरा येथे वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदा संस्थानाचे ते राजकवी झाले.

चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अलीकडच्या काळातील एक अवतार, असे त्यांना म्हटले जाई.

साहित्य[संपादन]

  • अर्वाचीन कविता
  • उघडं गुपित (कथाकाव्य)
  • कविता रति
  • किस्मतपूरचा जमीनदार (कथाकाव्य-१९३६)
  • गोदागौरव (स्तोत्रकाव्य)
  • चंद्रिका (स्फुट कवितांचा काव्यसंग्रह -१९३२)
  • चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर)
  • चैतन्यदूत (दीर्घकाव्य)
  • धनगर (दीर्घकाव्य)
  • रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल' आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर
  • स्वदेशप्रीती (दीर्घकाव्य)