चंद्रशेखर आझाद (रावण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे वकील, सामाजिक कार्यकर्ते व भीम आर्मी या संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. २०१५ मध्ये चंद्रशेखर यांनी अनुसूचित जातींच्या तरुणांची ‘भीम आर्मी’ ही संघटना स्थापन केली, ही संघटना उत्तरेतील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.[१][२] फेब्रुवारी २०२१ मध्ये, 'टाइम' नियतकालिकाने जगभरातील १०० उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत चंद्रशेखर आझाद यांचा समावेश केला आहे.[३][४][५] भविष्यावर परिणामकारक ठरू शकणाऱ्या शंभर व्यक्तिंच्या कार्याचा आढावा 'टाइम'कडून घेण्यात आला होता.[३]

अनुसूचित जातींवर (दलितांवर) झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध चंद्रशेखर व भीम आर्मी संघटना कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना निःशुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली. ५ मे २०१७ रोजी झालेल्या जातीय हिंसाचारात सामील असल्याचा आरोपावरून २०१७ च्या जूनमध्ये चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आणि २०१८ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.[६] चंद्रशेखर आझाद यांनी १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "My Son a Dalit Revolutionary, Says Bhim Army Chief's Mother". News18. 2019-07-30 रोजी पाहिले.
  2. ^ "What is the Bhim Army?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-05-18. 2018-11-24 रोजी पाहिले.
  3. ^ a b "'टाइम'च्या उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत चंद्रशेखर 'रावण'; 'या' पाच भारतीयांचाही समावेेश". Maharashtra Times.
  4. ^ "Bhim Army Chief Chandrashekhar Azad in TIME magazine's list of 100 emerging leaders". The Indian Express. 18 फेब्रु, 2021. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "Bhim Army chief Chandra Shekhar Aazad, 5 Indian-origin persons, feature in TIME magazine's list of 100 emerging leaders". 18 फेब्रु, 2021 – www.thehindu.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "चलो पुणे! 'भीम आर्मी'ची ३० डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभा". Loksatta. 2018-11-22. 2018-11-24 रोजी पाहिले.