रामानंद सागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंद्रमौली चोप्रा या पानावरून पुनर्निर्देशित)
रामानंद सागर
जन्म चंद्रमौली चोप्रा
२९ डिसेंबर १९१७ (1917-12-29)
लाहोर, ब्रिटिश भारत
मृत्यू १२ डिसेंबर, २००५ (वय ८७)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता, कथाकार

चंद्रमौली चोप्रा उर्फ रामानंद सागर (२९ डिसेंबर १९१७ - १२ डिसेंबर २००५) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक होते. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण ह्या टिव्ही मालिकेसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात असत. २००० साली रामानंद सागरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने स्न्मानित केले होते.

लाहोर येथे जन्मलेले रामानंद सागर १९४० च्या दशकात पृथ्वीराज कपूरसोबत सहाय्यक दिग्दर्शकाचे काम पाहत असत. १९५० साली त्यांनी स्वतःची सागर फिल्म्स नावाची कंपनी सुरू केली. ह्यादरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९६८ सालच्या आंखें ह्या सुपरहिट चित्रपटासाठी सागर ह्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. १९८५ साली रामानंद सागरांनी दूरचित्रवाणीकडे लक्ष केंद्रीत केले. १९८६ सालची विक्रम और वेताल ही मालिका लोकप्रिय ठरली तर १९८७ सालापासून सुरू झालेली ७८ भागांची रामायण ही रामायणावर आधारित मालिका प्रचंड यशस्वी झाली.

बाह्य दुवे[संपादन]