चंग चंगछ्यू
Appearance
चंग चंगछ्यू | |
---|---|
जन्म |
जानेवारी २५, १८८९ शांघाय, चीन |
मृत्यू |
जुलै १६, १९३५ शांघाय, चीन |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शन (चित्रपट) |
भाषा | चिनी |
चंग चंगछ्यू (देवनागरी लेखनभेद: चेंग चेंगछ्यू; सोपी चिनी लिपी: 郑正秋 ; पारंपरिक चिनी लिपी: 鄭正秋 ; पिन्यिन: Zheng Zhengqiu) (जानेवारी २५, १८८९ - जुलै १६, १९३५) हा चिनी चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक होता. चंग चिनी चित्रपटसृष्टीच्या जनकांपैकी एक मानला जातो. त्याने त्याचा मित्र व सहकारी चांग शिच्वान याच्याबरोबर इ.स. १९१३ साली एका लघुपटाची निर्मिती केली. पुढे इ.स. १९२२ साली त्या दोघांनी मिळून शांघाय येथे मिंगशिंग फिल्म कंपनी स्थापली.