चंग चंगछ्यू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे चिनी नाव असून, आडनाव चंग असे आहे.
चंग चंगछ्यू
जन्म जानेवारी २५, १८८९
शांघाय, चीन
मृत्यू जुलै १६, १९३५
शांघाय, चीन
कार्यक्षेत्र दिग्दर्शन (चित्रपट)
भाषा चिनी

चंग चंगछ्यू (देवनागरी लेखनभेद: चेंग चेंगछ्यू; सोपी चिनी लिपी: 郑正秋 ; पारंपरिक चिनी लिपी: 鄭正秋 ; पिन्यिन: Zheng Zhengqiu) (जानेवारी २५, १८८९ - जुलै १६, १९३५) हा चिनी चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक होता. चंग चिनी चित्रपटसृष्टीच्या जनकांपैकी एक मानला जातो. त्याने त्याचा मित्र व सहकारी चांग शिच्वान याच्याबरोबर इ.स. १९१३ साली एका लघुपटाची निर्मिती केली. पुढे इ.स. १९२२ साली त्या दोघांनी मिळून शांघाय येथे मिंगशिंग फिल्म कंपनी स्थापली.

बाह्य दुवे[संपादन]