घुमान साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

नामदेव महाराज यांच्या घुमान या कर्मभूमीत सरहद संस्थेतर्फे ३ व ४ एप्रिल २०१६ रोजी, आणि त्यानंतर दर वर्षी याच तारखांना एक बहुभाषिक राष्ट्रीय साहित्य संमेलन होणार आहे

२०१५ साली झालेल्या घुमानमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान सरहद संस्थेकडे होता. संमेलनाचा सर्व अनुभव पाहता दरवर्षी घुमान येथे साहित्य संमेलन भरवून परंपरा टिकविण्याचे सरहद या सामाजिक संस्थेने ठरविले आहे.

देशातील सर्व बहुभाषांचे संमेलन व्हावे, त्यासाठी मराठी भाषेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन कवी गुलजार यांनी केले होते. त्यांच्या आवाहनानुसार सरहद संस्थेने पुढाकार घेतला असून, घुमान येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. गणेश देवी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

या संमेलनाला महाराष्ट्रातील १०० धरून एकूण ५०० लोक जातील. सर्वांची निवासाची आणि भोजनाची सोय केली जाईल. संमेलनात आसामी, उर्दू, काश्मिरी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी आणि हिंदी या आठ भाषांतील कवी आणि लेखक यांचा सहभाग असेल.पहा : साहित्य संमेलने