घाटल लोकसभा मतदारसंघ
Appearance
(घटाल लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
घाटल हा भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील ४२ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आला. ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ पश्चिम मिदनापूर तर १ विधानसभा मतदारसंघ पूर्व मिदनापूर जिल्ह्यामध्ये आहेत.
२००८ साली पंस्कुरा लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व घाटल हा नवा मतदारसंघ तयार केला गेला. ह्यापूर्वी १९५१ ते १९७७ दरम्यान हा मतदारसंघ अस्तित्वात होता.
खासदार
[संपादन]लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पहिली लोकसभा | १९५२-५७ | निकुंजा चौधरी | भारतीय कम्युनिस्ट पक्ष |
दुसरी लोकसभा | १९५७-६२ | निकुंजा मैती | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
तिसरी लोकसभा | १९६२-६७ | सचिंद्र चौधरी | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
चौथी लोकसभा | १९६७-७१ | परिमल घोष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पाचवी लोकसभा | १९७१-७७ | जगदीश भट्टाचार्य | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष |
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | गुरूदास दासगुप्ता | भारतीय कम्युनिस्ट पक्ष |
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | देव (अभिनेता) | तृणमूल काँग्रेस |