घटसर्प (पशुरोग)
घटसर्प हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.विशेषतः म्हशींमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळतो.हा रोग 'पाश्चुरेला मल्टोसिडा' या विषाणूंमुळे होतो.
इतर नावे
[संपादन]या रोगास महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गळसुजी,परपड,घटसर्प या नावाने ओळखल्या जाते.
लागण
[संपादन]या रोगाचे जंतू जमिनीत, जनावराच्या नाकपुड्यात व श्वासनलीकेत असतात. रोगी जनावराचे नाकातोंडातून वाहणाऱ्या स्त्रावामुळे व दूषित चाऱ्याद्वारे हा रोग पसरतो.
लक्षणे
[संपादन]या रोगामुळे जनावरास फार ताप येतो.घशास सूज येते.श्वासोच्छवास जलद रितीने होतो.जनावराचे डोळे लाल होतात.ते सतत वाहतात. जीभ बाहेर येते. नाकातून शेंबडासारखा स्त्राव बाहेर पडतो व लाळ वाहते. कोणत्या कोणत्या जनावरांना काही वेळेस रक्ताची हागवण होते व अंगावर सूज येते.
औषधोपचार
[संपादन]पशुवैद्यक डॉक्टरांचे सल्ल्याने प्रतिजैविकांची इंजेक्शने, सल्फाDimedian
प्रतिबंधक उपाय
[संपादन]मे महिन्यात गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी
हेही बघा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |