ग्लोरिया स्वान्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्लोरिया मे जोसेफिन स्वान्सन (मार्च २७, इ.स. १८९९:शिकागो, इलिनॉय, अमेरिका - ४ एप्रिल, इ.स. १९८३:न्यू यॉर्क शहर, अमेरिका) ही अमेरिकेन चित्रपट अभिनेत्री होती. हिने मूकपट आणि बोलपट दोन्ही प्रकारच्या सिनेमांतून अभिनय केला. द ट्रेसपासर या तिच्या पहिल्या बोलपटासाठी तिला ऑस्कर नामांकन मिळाले. स्वान्सनने काही चित्रपटांचे निर्माणही केले.

चित्रपट अभिनयातून निवृत्त झाल्यावर स्वान्सनने नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांतूनही अभिनय केला.