ग्रीक पुराणकथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ग्रीक पुराणकथा ह्या प्राचीन ग्रीसमधील काल्पनिक कथा आहेत. ह्या कथासंग्रहामध्ये प्राचीन ग्रीसमधील लोकांच्या प्रचलित देवदेवता व वीरपुरुषांबद्दलच्या, तसेच विश्वाची उत्पत्त्ती आणि घडण ह्याबद्दलच्या पौराणिक कथांचा समावेश होतो. त्याचबरोबर ह्या कथांमधून त्या लोकांची स्वतःची संस्कृती व प्रचलित रितिरिवाज ह्यांचेही स्वरूप दिसून येते.

प्राचीन ग्रीसमधील राजकीय व धार्मिक संस्था आणि प्राचीन ग्रीक संस्कृतीवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी, तसेच पुराणकथांची व्युत्पत्ती कशी होते हे शोधण्यासाठी, आधुनिक काळात ह्या पुराणकथा व काल्पनिक कथांचा अभ्यास केला गेला आहे.