गोविंदप्पा वेंकटस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गोविंदप्पा वेंकटस्वामी
जन्म १ ऑक्टोबर १९१८ (1918-10-01)
वडामलपूरम तिरुनेलवेल्ली जिल्हा, तमिळनाडू भारत
मृत्यू ७ जुलै, २००६ (वय ८७)
मदुराई,तमिळनाडू

गोविंदप्पा वेंकटस्वामी हे भारतातील एक गणमान्य नेत्रतज्ज्ञ होते. ते अरविंद आय हॉस्पिटल या संस्थेचे जनक व माजी अध्यक्ष होते. त्यांनी आपले पूर्ण जीवन नेत्रविकार हटविण्यात लावले.त्यांनी निर्माण केलेली संस्था ही जगातील डोळ्यांच्या देखभालीसाठी असलेली एक अग्रगण्य संस्था आहे.

या संस्थेद्वारे, सुमारे ५५ लाख नेत्ररुग्णांची तपासणी केल्या गेली व सुमारे ६.८ लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या गेल्यात.यापैकी अनेक रुग्णांनी त्यापोटी काहीच शुल्क दिले नाही अथवा अत्यंत माफक दरात त्यांचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

डॉ. गोविंदप्पांना भारत सरकारतर्फे सन १९७३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.