गोवर्धन परिक्रमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोवर्धन परिक्रमा म्हणजे उत्तर प्रदेशात असलेल्या मथुरा शहराजवळच्या गोवर्धन पर्वतास प्रदक्षिणा घालणे होय. या पर्वतास कृष्णाने आपल्या करंगळीवर उचलला होता अशी आख्यायिका आहे. त्याने हा पर्वत उचलून त्याखाली गोकुळातील प्रजाजनांना आश्रय दिला व मुसळधार पावसापासून त्यांना आठवड्यापर्यंतच्या काळासाठी वाचविले होते. असे केल्याने पाऊस पाडणाऱ्या इंद्राचा तेव्हा गर्व उतरला होता.

मथुरा व वृंदावन या प्रदेशास व्रजभूमी असेही नाव आहे.

यमुना नदी व गोवर्धन पर्वत यामुळे तेथील लोकांचे जीवन समृद्ध झाले आहे अशी त्या परिसरातील लोकांची श्रद्धा आहे. त्यांना समृद्ध करणाऱ्या गोवर्धन पर्वतास परिक्रमा करून तेथील लोक त्याचे आभार मानतात.[१]

परिक्रमेचे तीन प्रकार[संपादन]

  • १. चौऱ्यांशी कोसी परिक्रमा
  • २. गोवर्धन पर्वताची पायी परिक्रमा(सुमारे २१ कि.मी.)
  • ३. वृंदावन परिक्रमा (सुमारे ११ कि.मी)

संदर्भ[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.