गोपाल गायन समाज संगीत महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोपाल गायन समाज संगीत महाविद्यालय ही हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणारी पुण्यातील एक संस्था आहे.

स्थापना[संपादन]

गोपाल गायन समाज विद्यालयाची स्थापना १ जुलै १९१८[१] रोजी हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि गुरू पंडित गोविंदराव गोपाल देसाई यांनी केली. त्यांचे गुरु विष्णू दिगंबर पलुसकर यांनी हिंदुस्थानी संगीताच्या प्रसारासाठी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनीच देसाई यांना हे विद्यालय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. लोकमान्य टिळक यांनीसुद्धा या संस्थेच्या उभारणीसाठी पाठिंबा दिला.

कार्य[संपादन]

गोपाल गायन समाज महाविद्यालयात शास्त्रीय संगीत, सुगम संगीत तसेच व्हायोलिन, बासरी, सिंथेसायझर, संवादिनी, तबला, गिटार या वाद्यांच्या वादनाचे शिक्षण देण्यात येते. देसाई यांनी स्वत: संगीत प्रथमा, संगीत मध्यमा व संगीत विशारद असा संगीताचा तीन भागात अभ्यासक्रम तयार केला. त्यांनी सुमारे साठ वर्षे या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. [२]

२०१८ साली ही संस्था आपली शतकपूर्ती साजरी करत आहे.

विद्यालयाचे उल्लेखनीय माजी विद्यार्थी[संपादन]

या विद्यालयात पंडित जितेंद्र अभिषेकी, गजाननराव वाटवे यांनी या विद्यालयात काही काळ संगीत शिक्षण घेतले होते.

विद्यालयातर्फे दिला जाणारा पुरस्कार[संपादन]

विद्यालयातर्फे 'पंडित गोविंदराव देसाई जीवन गौरव पुरस्कार' दिला जातो. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या काही व्यक्ती

  1. पंडित अजय पोहनकर


संदर्भ[संपादन]

  1. ^ Rajpal, Preeti (2013-12-01). Bharatiya Sangeet Samajik Savroop Avm Parivartan (hi मजकूर). Unistar Books. आय.एस.बी.एन. 9789351132516. 
  2. ^ "अविरत संगीतसाधनेची शताब्दी -Maharashtra Times". Maharashtra Times (mr मजकूर). 2018-07-02. 2018-07-03 रोजी पाहिले.