गॉटलीब डाइमलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गॉटलीब विल्हेम डाइमलर (१७ मार्च, १८३४:शोर्नडोर्फ, जर्मनी - ६ मार्च, १९००:श्टुटगार्ट, जर्मनी) हा एक जर्मन अभियंता होता. याला अंतर्ज्वलन (इंटर्नल कंबश्चन) इंजिनाचा शोध लावण्याचे श्रेय दिले जाते. याने आपल्या सहकारी विल्हेम मेबाख बरोबर मोटारगाड्यांतून वापरता येण्याजोगे इंजिन तयार केले. त्यानंतर त्यात सुधारणा करुन दुचाकीला हे इंजिन लावता येण्यासारखे केले. त्यांनी हे इंजिन वापरणारी जगातील पहिली मोटरसायकल पेट्रोलियम राइटवागन १८८५ साली तयार केली. १८८६मध्ये त्यांनी अनेक प्रवासी नेऊ शकणाऱ्या बसमध्ये वापरण्यासाठीचे इंजिन तयार केले तसेच हे इंजिन बोटींमध्येही लावले.

डाइमलर आणि मेबाखने डाइमलर मोटोरेन गेसेलशाफ्ट (डीएमजी) ही कंपनी सुरू केली व १८९२ साली जगातील पहिली मोटरगाडी विकली.

डाइमलरच्या मृत्यूनंतर १९२६ साली डीएमजी आणि बेंत्स उंड साइ या कंपन्या एकत्र होउन डाइमलर-बेंत्स कंपनी निर्माण झाली.