गुलचग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नैमन टोळीचा प्रमुख तायांग खानाचा पुत्र. चंगीझ खानाने नैमन टोळीवर हल्ला केला असता गुलचगने आपला जीव वाचवण्याकरता तेथून पळ काढला व कारा खितान राज्यात आश्रय घेतला. पुढे खितान टोळीप्रमुखाच्या मुलीशी लग्न करून त्याने सत्ता काबीज केली.

गुलचग धर्माने ख्रिश्चन असून खितान टोळी बौद्ध होती परंतु खितान राज्यात अनेक मुसलमान राहात होते. गुलचगच्या अनन्वित अत्याचारांना कंटाळून त्यांनी चंगीझ खानासमोर आपल्या तक्रारी मांडल्या. चंगीझने आपला विश्वासू सरदार जेबे याला २०,००० सैनिकांच्या सैन्यानिशी कारा खितानवर स्वारी करण्यास पाठवले. जेबेने या लढाईत गुलचगचा पराभव करून त्याला ठार केले.