गुन्नार मर्डाल
कार्ल गुन्नार मर्डाल (६ डिसेंबर, १८९८ - १७ मे, १९८७), एक स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि नोबेल पुरस्कार विजेता होते. १९७४ मध्ये, अर्थशास्त्र क्षेत्रात आर्थिक तफावतीच्या सिद्धांतामध्ये मौलिक कार्य, तसेच आर्थिक, सामाजिक आणि संस्थात्मक घटनांसाठी सूक्ष्म विश्लेषण करण्याबद्दल अर्थशास्त्रज्ञ फ्रेडरीक हायेक यांसह त्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९८१ साली त्यांची पत्नी अल्वा मायर्डल यांच्यासमवेत त्यांना जवाहरलाल नेहरू पुरस्कार देण्यात आला.