गुणवत्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मालाची गुणवत्ता 

मालाच्या म्हणजे बनवलेल्या वस्तूच्या (किंवा दिलेल्या सेवेच्या) प्रतीचे मोजमाप.वस्तू जरी चांगली बनवलेली असेल तरी त्याची गुणवत्ता ही ग्राहकच ठरवत असतो.कारखान्यात ज्या वस्तू ( माल ) बनविला जातो, तो विशिष्ट प्रक्रियेतून जात असतो. ही प्रक्रिया लिहून त्या प्रमाणे जर माल बनवला तर त्या मध्ये शिरणारे नको असलेले वस्तूवस्तूंमधले फरक कमी करता येतात. त्या साठी प्रकियेचे प्रमाणीकरण करणे ही पहिली पायरी. दुसरे म्हणजे प्रक्रियेचे प्रशिक्षण.ज्या व्यक्ती ती प्रक्रिया हाताळत असतात त्यांना त्याचे प्रशिक्षण देणे फार जरूर असते. 

माल बनत असताना त्यात काही दोष किंवा त्रुटी राहिल्या असतील तर त्या जिथे निर्माण झाल्या तेथेच पकडल्या जाणे फार महत्त्वाचे. उशीरा पकडून चालणार नाही.तसे झाल्यास फार कष्ट घेऊन त्या मालावर पुन्हा काम करावे लागून ते फार खर्चिक होते.त्यासाठी बऱ्याच ठिकाणी त्रुटी होणारच नाही याची योजना करावी लागते. 

बऱ्याच वेळेस एक गट त्या प्रक्रियेत कोणते दोष येऊ शकतील आणि त्यावर काय उपाय योजना करता येथील याचा अभ्यास आधीच करतो.त्या मुळे बऱ्याच गोष्टी आधीच निदर्शनाला येतात आणि त्यावर उपाययोजना सुद्धा  करता येते. 

वस्तू बनवतानाच चांगली बनते आहे ना? त्या मध्ये काही वसयवस्तूंमध्ये फरक तर होत नाही ना? या साठी संख्याशास्त्रीय नियमांचा प्रक्रिया नियंत्रित करण्या साठी उपयोग केला जातो.

मालाची गुणवत्ता माल बनवतानाच त्यात आली  पाहिजे. माल बनवून झाल्या नंतर, तो तपासून त्यात गुणवत्ता घालता येत नाही. 

थोडक्यात,

मालाच्या गुणवत्तेसाठी खालील पायऱ्या महत्त्वाच्या आहेत ,

१.ग्राहकाला काय पाहिजे ते समजून घेणे. 

२.माल प्रमाणित प्रक्रियेतूनच तयार करणे. 

३.माल बनत असतानाच तो बरोबर बनत आहे ना याची देखरेख ठेवणे 

४.वस्तूं मध्ये कमीत कमी फरक असावा या साठी  संख्याशास्त्रीय नियमांचा प्रक्रिया नियंत्रित करण्या साठी उपयोग करणे