Jump to content

गांधीतीर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गांधीतीर्थ हे जळगाव शहरातले एक निसर्गरम्य ठिकाण आहे.[]

परिसर

[संपादन]

या ठिकाणी एका टेकडीवजा भागांत विविध प्रकारच्या झाडांनी, वेलींनी बहरलेला परिसर आहे. आंबा, गुलमोहर, कडुनिंब, विविध रंगांच्या बोगनवेली व आणखी बऱ्याच प्रकारचे वृक्ष या ठिकाणी डोलताना दिसतात. गांधीतीर्थाच्या टेकडीवर भंवरलाल जैन यांनी सुरू केलेला आंतरराष्ट्रीय उद्योग समूह आहे. या समूहातर्फे फळांवर प्रक्रिया करणे, कांदा निर्जलीकरण, टिश्यू्कल्चरने केळीच्या झाडांची रोपे तयार करणे, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणे, शेतीची अवजारे बनविणे, बायोगॅस निर्मिती, ठिबक सिंचन, झाडांसाठी खत बनविणे अशी विविध प्रकारची कामे चालतात.

स्वरूप

[संपादन]

चित्रपट, चित्रे व पुतळे यांच्या माध्यमांतून महात्मा गांधींचे जीवन दर्शविणारे अद्ययावत वातानुकूलित संग्रहालय आहे.[] गांधी संदर्भांतील आणि त्यांना आवडणाऱ्या विषयांतील अनेक ग्रंथ येथे आहेत. येथे अभ्यासकांसाठी आरामदायी खोल्या आणि अभ्यासिका सुद्धा आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Gandhi Teerth, Jalgaon | Gandhi Tourist Places". www.mkgandhi.org (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
  2. ^ "esakal | जळगावचे "गांधीतीर्थ' व्हाया मुंबई पोहोचले कॅनडा! ". www.esakal.com. 2021-10-02 रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 58 (सहाय्य)