गांदरबल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गांदरबल हे भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील गांदरबल जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपालिका समिती आहे. हे गांदरबल जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे काश्मीरच्या मध्यभागात आहे. या शहराची सरासरी उंची १,६१९ मीटर (५,३१२ फूट) आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार[१] गांदरबलची लोकसंख्या २,९७,४४६ इतकी होती.[२] यांपैकी ५३.३६% पुरुष तर ४६.४६% स्त्रीया होत्या. येथील साक्षरता प्रमाण ५८.०४% इतके होते[३]

वाहतूक[संपादन]

रस्ते[संपादन]

गांदरबल राष्ट्रीय महामार्ग १ द्वारे जम्मू आणि काश्मीर आणि भारतातील इतर ठिकाणांशी रस्त्याने जोडलेले आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. Archived from the original on 2004-06-16. 2008-11-01 रोजी पाहिले.
  2. ^ census of India official website, www.census2011.co.in
  3. ^ this is census of India 2011, www.census2011.co.in