सोनोग्राफी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनोग्राफी यंत्र
सोनोग्राफी मशिनचे प्रोब

सोनोग्राफी हे उच्चगामी ध्वनीलहरींच्या गुणधर्मांचा वापर करून शरीराच्या अंतर्गत अवयवांचे चिरफाड न करता अवलोकन करणारे तंत्र आहे. या तंत्रामुळे जटील तसेच नाजुक रचना असलेले अवयव मांसपेशी, सांधे, स्नायू यांचे सहजपणे अवलोकन करून निदान करणे शक्य झाले आहे. पण मुख्यतः सोनोग्राफी तंत्राचा वापर गर्भावस्थेतील भृणाची वाढ, व्यंग यांचे अचुक निदान अर्भक जन्माला येण्यापूर्वीच करता यावे, या उद्देशाने केला जातो.त्याचप्रमाणे स्त्रीरोगांवर निदान व उपचार करणे या तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे.

कार्यपद्धती[संपादन]

  • ( आपण २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतो. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.)

सोनोग्राफी तंत्रात १ ते १८ मेगाहर्ट्झ् इतकी कंप्रता असलेल्या अशा उच्चगामी ध्वनीलहरींचा वापर होतो. ट्रांसड्युसर हा प्रोबचे कार्य करतो, त्वचेवर टेकवला असता उच्चगामी ध्वनीलहरींचे तो शरीरात प्रक्षेपण करून परावर्तित लहरींचे ग्रहण करून संगणकाला पाठवत असतो. संगणक त्याच्या साहाय्याने प्रतिमा निर्माण करतो. या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष दिसु न शकणाऱ्या ठिकाणावरून प्रतिमा निर्माण करता येतात.


उपयोग[संपादन]

  • सोनोग्राफी हे एक प्रसुतीपुर्व वैद्यकीय तपासणीपैकी एक तपासणी आहे. ध्वनिलहरी, क्ष किरणांपेक्षा खूपच सौम्य असल्याने यांचा त्रास गर्भाला अजिबात होत नाही. म्हणूनच गर्भाची वाढ, गर्भाचे रोग, गर्भधारणा यांचा पूर्ण अभ्यास कितीही वेळा करता येऊ शकतो.
  • पोटातील किंवा उदरपोकळीतील अवयवांचा प्रत्यक्ष न पहाता तपासणी करणे.
  • स्त्रियांमधील वैंधत्व (इनफर्टिलिटी) मध्ये त्यांच्या गर्भाशयाचा व नलिकांचा अभ्यास - व्यतिरिक्त बिजांडामधील बिजांची वाढ व बीजधारणा (ओव्हयुलेशन स्टडी) यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये स्पेशल प्रोब (टी.व्ही.) हा योनी मार्गात घातला जातो. यामुळे बिजे स्वच्छ व स्पष्ट दिसतात.
  • स्त्रियांमध्ये गर्भाशयाला होणारे विविध रोग व बिजांडांना होणारे विविध रोग यांचा तपास सोनोग्राफी करते.

कायदा[संपादन]

भारतात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques: PCPNDT Act) १९९४ साली करण्यात आला. गर्भलिंग तपासणीविरुद्ध कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात १९८८ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. २००३ साली यात सुधारणा करण्यात आल्या.[१]

या कायद्यानुसार गर्भलिंग निदान करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे.या कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक सोनोग्राफी चाचणीची माहिती सरकारला देणे बंधनकारक आहे. स्‍त्री भृणहत्येसारख्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा केलेला आहे. 'पीसीपीएनडीटी' कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सोनोग्राफी यंत्राचे परवाने तात्पुरते रद्द करून सील ठोकले जाऊ शकते किंवा कारावास व जबर दंड ठोठावला जाऊ शकतो.

बाह्यदुआ[संपादन]

  1. ^ भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरील पुस्तिका