Jump to content

गणेश बाबाजी माटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणेश बाबाजी माटे (२५ नोव्हेंबर, १८३६ - १० नोव्हेंबर, १८९०) हे कायदा, वेदान्त आणि व्यावहारिक विषयावरील ग्रंथाचे लेखक होते.

माटे यांनी आपल्ा वडिलांच्या हाताखाली वेदांचा अभ्यास केल्यावर पुण्याच्या सरकारी शाळेत काही काळ अध्यापन केले. यानंतर मुलकी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते कलेक्टर कचेरीत नोकरीला लागले. पुढे फौजदार झाले. नंतर फौजदारीचा राजीनामा देऊन त्यांनी वकिलीचा अभ्यास सुरू केला. वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर माट्यांनी स्वतंत्रपणे वकिलीचा व्यवसाय केला. ते काही काळ सोलापुरात सरकारी वकील होते.

लेखन[संपादन]

अस्सल इंग्रजी कालखंडात असून, माट्यांनी मराठीतून तब्बल सहा कायदेविषयक पुस्तके लिहिली. त्यांपैकी न्यायाची तात्त्विक व व्यावहारिक चर्चा करणारे त्यांचे 'न्यायरत्न ' हे अशा प्रकारचे मराठीतील पहिलेच पुस्तक ठरले.

सन १८८७ च्या सुमारास 'बालबोध' मासिकातर्फे एक निबंध स्पर्धा जाहीर झाली. या निबंधाचा विषय होता. 'भाऊबंदांतील कलह आणि ते निवारण्याचा उपाय'. या निबंधासाठी गणेश बाबाजी माटे यांनी वेदान्ताचा सखोल अभ्यास केला, आणि त्याचे फलित म्हणजे एक हजार पृष्ठांचा 'ब्रह्मविद्या प्रबोधन' हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

त्यांची अन्य पुस्तके :- 'अग्नी क्रीडा' हे दासकाव्यासंबंधी अभिनव पुस्तक त्यांनी लिहिले. मुकुंदराजकृत परमामृत हा ग्रंथही त्यांनी संपादित केला आहे. याशिवाय चित्रकला, कागदी नक्षीकाम ही दोन पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. सन १८७४मध्ये त्यांनी देश कल्याणार्थ स्वलिखित कीर्तनांचा संग्रह प्रसिद्ध केला.