गणपत कृष्णाजी पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिंदू पंचांग

गणपत कृष्णाजी हे मराठी भाषेतील पहिल्या छापील पंचांगाचे निर्माते आहेत. हे मुंबईतील पहिले छाप कारखानदार म्हणून ओळखले जातात.

पहिले छापील पंचांग[संपादन]

१६ मार्च १८४१ च्या दिवशी गणपत कृष्णाजी यांनी शिळाप्रेसवर पहिले पंचांग छापले.[१] त्यापूर्वी त्यांनी ते हाताने लिहून काढले. प्रचलित पंचांग वापरणाऱ्या तत्कालीन व्यक्तींनी या पंचांगाला विरोध केला. पण काळाच्या ओघात हा विरोध मावळला आणि या पंचांगाचा स्वीकार केला गेला.

महत्त्व[संपादन]

हिंदू धर्म आणि संस्कृती यांच्या अभ्यासात आणि भारतीय जीवन पद्धतीत पंचांग महत्त्वाचे मानले जाते. फलज्योतिष आणि खगोलशास्त्र या विषयाच्या अभ्यासक व्यक्ती तसेच पौरोहित्य करणारे लोक यांना पंचांगाचा वापर करावा लागतो. गुढीपाडवा सणाच्या दिवशी नव्या वर्षाचे फल वाचण्यासाठी पंचांग वापरतात आणि त्याची पूजा करतात.[२] हे पंचांग पूर्वी हाताने लिहिले जात असे. १८३९ मध्ये ख्रिस्ती धर्मोपदेशक लोकांनी शिळाप्रेसवर पुस्तके छापण्यास सुरुवात केली. ते पाहून गणपत कृष्णाजी यांनी या पद्धतीने पंचांग छापले.[१]

प्रक्रिया[संपादन]

रखमाजी देवजी मुळे यांनी महाराष्ट्र राज्यात प्रथमच तिथी, वार, नक्षत्र यांच्या आधारे कालनिर्णय करणारे पंचांग रूढ केले आणि गणपत कृष्णाजी यांनी त्याची सजावट करून त्याला प्रकाशित केले.[३] शके १७५३ चे खर या नावाच्या संवत्सराचे हे पंचांग आहे.[३]

हे ही पहा[संपादन]

पंचांग

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "मराठीतील पहिल्या छापील पंचांगाचे कर्ते दुर्लक्षितच". Loksatta. 2016-03-27. 2021-03-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Gudi Padwa गुढीपाडवा: शुभमुहूर्तावर असं करा पूजन". Maharashtra Times. 2021-03-15 रोजी पाहिले.
  3. ^ a b Sarvanje, Vinayak. "पंचांगाचे जनक गणपत कृष्णाजी |" (इंग्रजी भाषेत). 2021-03-15 रोजी पाहिले.