Jump to content

गटविकास अधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो. हा अधिकारी राजपत्रित अधिकारी गट अ मधील असतो.

नेमणूकीची तरतूद

[संपादन]

महाराष्ट्रात

[संपादन]

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम ९७ मध्ये प्रत्येक गटासाठी एक गटविकास अधिकारी असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. गटविकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून व नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून होते. काही जागा जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. हा अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याकडील अधिकारी असून त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते.

निवड व नियुक्ती.

[संपादन]

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तर नियुक्ती राजशासनाद्वारे केली जाते.

महाराष्ट्रात

[संपादन]

गटविकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून व नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून होते. काही जागा जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. हा अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याकडील अधिकारी असून त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते.

कार्ये

[संपादन]
  1. पंचायत समितीची अधिकृत कागदपत्रे स्वतःच्या सहीने हस्तान्तरित करणे किंवा जतन करणे.
  2. पंचायत समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहणे
  3. समितीच्या निर्णयांची अम्मलबजावणी करणे
  4. पंचायत समितीच्या इतर अधिकाऱ्यांवर देखरेख व नियन्त्रण ठेवणे.
  5. अंदाजपत्रक तयार करणे.