Jump to content

गझनीच्या महमूदची भारतावरील पहिली स्वारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गझनीच्या महम्मदाची भारतावरील पहिली स्वारी या पानावरून पुनर्निर्देशित)

गझनीच्या महमूदची भारतावरील पहिली स्वारी इ.स. १००० - ०१ मध्ये झाली होती. गझनीचा महमूद या आपल्या भारतावरील पहिल्या स्वारीच्या वेळी खैबर खिंड पार करून आला होता. या आपल्या स्वारीत त्याने हिंदुशाही राज्यातील काही प्रदेश आणि किल्ले काबीज केल्यावर अफगाणिस्तानमध्ये परत जाताना खैबर खिंडीच्या भारताच्या बाजूला त्याने आपल्या सैन्याची एक तुकडी तैनात केली होती कारण तो भाग आता त्याच्या राज्याच्या संरक्षक कवचाचा एक भाग होता.

महमूदाने या आपल्या पहिल्या स्वारीत पंधरा हजार सैन्यानिशी जयपालाशी युद्ध केले. या युद्धात जयपालाचा पराभव झाला व तो स्वतः महमूदाच्या हाती सापडला. नंतर जयपालाने मोठा दंड भरून आपली सुटका करून घेतली. या भारतावरील पहिल्या स्वारीत महमूदाला भरपूर जडजवाहीर व लूट मिळाली.