खैरी प्रकल्प जामखेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खैरी मध्यम प्रकल्प जामखेड तालुक्‍यातील एकमेव मध्यम प्रकल्प आहे. याशिवाय तालुक्यात नऊ लघुप्रकल्प आहेत. खैरी वाकी येथे ५३५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या प्रकल्पाचे काम १९८८ मध्ये झाले. त्यामुळे या भागात ऊसउत्पादकांची संख्या वाढली. २०१०-१७ अशी सात वर्षे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. त्यामुळे येथील शेती धोक्‍यात आली होती. उसाच्या पिकांनी बहरलेल्या मळ्यांच्या ठिकाणी कोरडवाहू पिके घेतली जाऊ लागली. शेतकऱ्यांवर रोजगारासाठी स्थलांतर करण्याची वेळ आली.

यंदा सलग दोन वर्षी  पावसाने चांगली साथ दिली आणि सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. खैरी प्रकल्पाची पाणीपातळी ५६१.७५ दशलक्ष घनफूट असून, ५६२.३२ दशलक्ष घनफूट सांडवा पडतो. धरणाची क्षमता ५३३ दशलक्ष घनफूट आहे. पैकी ४२२.७० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे परिसरातील सातेफळ, तरडगाव, दौंडवाडी, वंजारवाडी, वाकी, लोणी, सोनेगाव, धनेगाव, बालखडक, आनंदवाडी, खर्डा येथील शेतीचा पाणीप्रश्‍न सुटला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जामखेड तालुक्‍याला हा प्रकल्प मोठा आधारवड ठरणार आहे. तलावाला एकमेव डावा कालवा असून, तो २१ किलोमीटरपर्यंत आहे. त्यापैकी ११ किलोमीटरचा भाग मराठवाड्याचा आहे.खर्डा शहराला पाणी पुरवठा करणारा खैरी तलाव तसेच मोहरी व जवळके येथील तलाव ओव्हरफ्लो झाले आजपर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत १०४. ९९ टक्के पाऊस झाला असून,जामखेड येथे ७६५ मिमी खर्डा ६४३ नान्नज ६२६. १ मी मी नायगाव ६०४ मी मी अरणगाव ६५५. ३ मी मी असा एकूण सरासरी ३२८६ पाऊस झाला आहे तर ,आज अखेर सरासरी ६२६ मी मी  तर तालुका तालुका सरासरी ६२६ एवढी पावसाची नोंद झाली आहे.तलावांची क्षमता दशलक्ष घनफुटांत पुढीलप्रमाणे -खैरी प्रकल्प क्षमता (५३३,५०) ,भूतवडा तलाव (११९) ,नवीन भूतवडा तलाव(४८,२५) ,रत्नापूर तलाव (८३,७०),धोत्री तलाव (५५,६० ),धोंडपारगाव तलाव (८७,९४ ),नायगाव तलाव (८३,७६) ,तेलंगशी तलाव (३५,८८),मोहरी तलाव (६२,५०) पिंपळगाव आवळा तलाव (१००,४९ ),जवळके तलाव,(३६,११) तर जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नातून तालुक्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे तालुका जलयुक्त झाला आहे सांगवी ,पिपरखेड ,जवळा ,कवडगाव ,गिरवली येथील कोल्हापुरी  पद्ध्तीचे बंधारे पूर्णपणे भरले आहेत