Jump to content

खिळणा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खिळणा हे विशाळगडाचेच एक जुने नाव आहे. विशाळगड किल्ला हा कोल्हापूरचा शिलाहार राजा मारसिंह याने सन १०५८ मध्ये बांधला व त्याचे नाव खिलीगल असे ठेवले. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे खिळणा किंवा खेळणा असे झाले.

हा किल्ला शिवपूर्व काळात विजापूरच्या आदिलशहानेकडे होता. आदिलशहाने सन १५०० च्या सुमारास या किल्ल्याच्या खर्चाकरीता कोकणातील देवळे महाल, हरचेरी महाल, हातखंबा महाल व अर्धा देवरुख महाल अशा एकूण साडेतीन महालांचा मिळून नवीन मामला म्हणजेच तालुका तयार करण्यात आला. खिळणा तालुक्यात एकूण ९० गावे होती. खिळणा तालुक्याच्या कारभारासाठी सरदेसाई, सरदेशपांडे, सरपोतदार असे स्वतंत्र जमेदार नेमण्यात आले. देवळ्याचे सरदेसाई हे खिळणा तालुक्याचे सरदेशमुख होते. तसेच साखरप्याचे सरदेशपांडे हे खिळणा तालुक्याचे सरदेशकुलकर्णी होते.