सरदेसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरदेसाई हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मणांमध्ये आढळते.

इतिहास[संपादन]

या घराण्याचे मूळ पुरुष नृसिंहभट सत्यवादी हे मूळचे गोदावरी नदीकाठी वसलेले पैठणचे रहिवासी होते. त्यांना पुत्र नव्हते, म्हणून ते तीर्थयात्रेला बाहेर पडले. फिरताना ते कोकणात संगमेश्वर नजीक मावळंगे या गावी आले. तेथील नरसिंह देवस्थानात त्यांनी तपश्चर्या केली. ईश्वरी कृपेने त्यांना पुत्र झाला. त्यांचे नातू दुसरे नृसिंहभट यांस कोल्हापूरच्या शिलाहार राजा विजयार्क यांनी चालुक्यांचा कोकणातील राजधानीचा गाव संगमेश्वर हा इनाम दिला. ही घटना इ.स. ११८५च्या सुमाराची असावी.[१]

  1. ^ कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास-लेखक-कै.विष्णू वासुदेव आठल्ये- राहणार शिपोशी, तालुका लांजा, पुस्तक प्रकाशन-इ.स.१९४७