खापर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हान साम्राज्यातील खापर व मातीच भांड

खापर हे एक पुरातत्त्वीय साधन आहे. पुरातत्त्वीय साधन म्हणून खापरांना महत्त्व दिले जाते.खापराला पुरातत्त्व विद्येची मुळाक्षरे संबोधले जाते.तुटलेले मातीचे भांडे म्हणजे खापर होय.खापर आणि मातीची भांडी हजारो वर्षांपासून मानवाने वापरात आणली आहेत. भारतात सुमारे पाच हजार वर्षांपासून माणसे मातीच्या भांड्यांच्या खापरांचे वापर करीत आले आहेत.[१]

उत्खनन आणि वैशिष्ट्य[संपादन]

जगभरात झालेल्या उत्खननांमध्ये खापरे आणि मातीची भांडे सापडली आहेत. प्रत्येकाचा रंग वेगळा, चकाकी वेगळी, त्यावरील रंगकाम किंवा नक्षीकाम वेगवेगळे असते. रोम(इटली),इजिप्त,ग्रीस आणि भारत या प्रत्येक देशात झालेल्या उत्खननात मिळालेल्या भांड्यांचे व खापरांचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे.[२]

  1. ^ 1876-1960., Kroeber, A. L. (Alfred Louis), (1998). The archaeology and pottery of Nazca, Peru : Alfred L. Kroeber's 1926 expedition. AltaMira Press. ISBN 0-7619-8964-1. OCLC 37341215.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ Pottery and Social Life in Medieval England. Oxbow Books. 2014-07-31. pp. 33–69. ISBN 978-1-78297-662-2.