खांडबहाले
Appearance
खांडबहाले हे व्यक्तीचे शेवटचे नाव आहे, म्हणजेच आडनाव आहे. जसे - सुनील खांडबहाले
'खांडबहाले' या शब्दामध्ये -
(१) 'खांड' म्हणजे 'खंड' याचा अर्थ "जमिनीचा तुकडा" किंवा "जमिनीचा भाग" असा होतो तर
(२) 'बहाले' या शब्दाचा अर्थ "बहाल करणारें"
यावरून 'खांडबहाले' याचा अर्थ कुणी काही चांगले कार्य केल्यास, त्यांस बक्षिस किंवा सन्मान म्हणून "भूभाग बहाल करणारें" असा होतो.
'खांडबहाले' या शब्द 'खंडवावाले' या शब्दाचा अपभ्रंश असावा असंहि काहींचे म्हणणे आहे. मध्य प्रदेशातील 'खंडवा' या गावाहून स्थलांतरित झालेलें ते 'खंडवावाले' असा अर्थ असावा, पुढे त्याचा अपभ्रंश होऊन 'खांडबहाले' असा झाला असावा असा तर्क केला जातो.
'खांडबहाले' आडनावाचे लोक प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील 'महिरावणी' या गावात आहेत.