सुनील खांडबहाले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुनील खांडबहाले
Sunil Khandbahale.jpg
जन्म १ जून १९७८
नाशिक, महाराष्ट्र, भारत
निवासस्थान महिरावणी, नाशिक, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
शिक्षण मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि
एमआयटी स्लोन स्कुल ऑफ मॅनेजमेंट
पेशा संस्थापक, खांडबहाले.कॉम
सचिव, ग्लोबल प्रोस्पेरिटी फाउंडेशन
अध्यक्ष, कुंभथॉन


सुनील शिवाजी खांडबहाले (जन्म १ जून, १९७८) हे नाशिकमधील एक संशोधक आणि उद्योजक आहेत. ते मूळचे त्र्यंबकेश्वर जवळील महिरावाणी या खेड्यातील आहेत. अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर इंग्रजी भाषेच्या भीतीवर मात करण्यासाठी आणि ही भाषा अवगत करण्यासाठी मदत व्हावी म्हणून त्यांच्या एका प्राध्यापकांनी त्यांना शब्दकोश दिला. त्यावरून पुढे त्यांना डिजिटल शब्दकोशाची कल्पना सुचली. [१]

KHANDBAHALE.COM या मोफत बहुभाषिक डिजिटल शब्दकोश असलेल्या वेबसाईटचे ते संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. हा डिजिटल शब्दकोश भाषांतरासाठीचा प्लटफॉर्म म्हणून सुद्धा वापरला जातो. 23 भाषांमधील शब्दसंग्रह असलेली ही वेबसाईट आजवर जगभरातून कोट्यवधी लोक नित्याने वापरत असतात. [२] सुनील खांडबहाले हे 'डिक्शनरीमॅन' म्हणून संबोधले जातात. भाषा व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच भारताचे महामहिम राष्ट्रपती यांनीदेखील सुनील यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. [३] सुनील KHANDBAHALE.ORG या संस्थेचे सुद्धा संस्थापक आहेत. या संस्थेतर्फे भाषाविषयक विविध प्रकल्प चालवले जातात.[४]

तंत्रज्ञानाच्या मदतीने तळागाळातील समस्यांचे निराकरण व्हावे आणि देशातील तरुणांमध्ये नवप्रवर्तन संस्कृती रुजवली जावी यासाठी त्यांनी मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजिसह अनेक जागतिक तंत्रज्ञान कंपन्यां व नवसंशोधकांसोबत 'कुंभथॉन' मोहीम सुरु केली. [५]

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

  • कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा 'यशोकीर्ती पुरस्कार'
  • टाईम्स ग्रुपचा युथ आयकॉन पुरस्कार [६]
  • नोकीयाकडून "स्थानिक भाषेतील सर्वोत्तम अनुप्रयोग" पुरस्कार
  • राष्ट्रीय इन्फोर्मेशन कम्युनिकेशन अँड टेकनॉलॉजि (आय.सी.टी.) वास्विक पुरस्कार

संदर्भ[संपादन]


बाह्यदुवा[संपादन]

संकेतस्थळ : sunil.khandbahale.com