Jump to content

बोरघाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खंडाळ्याचा घाट या पानावरून पुनर्निर्देशित)
बोरघाटातून वाट काढणारा मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग
ભોર ઘાટ (gu); Borghāt Pass (ceb); Borghāt Pass (sv); ಬೋರ್ ಘಾಟ್ (kn); बोरघाट (mr); Bhor Ghat (de); Bhor Ghat (en); Bhor Ghat (en-gb); Bhor Ghat (en-ca); भोरघाट (hi); Bhor Ghat (de-ch) Borghat onitha Bombay (en); Borghat onitha Bombay (en)
बोरघाट 
Borghat onitha Bombay
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारrail mountain pass
स्थान भारत
लांबी
  • २८ km
पर्वतश्रेणी
Map१८° ४६′ ००″ N, ७३° २२′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बोरघाट हा सह्याद्री डोंगररांगेमधला घाटरस्ता आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाला पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराशी जोडतो. हा घाट राष्ट्रीय महामार्ग ४ वर आहे. या घाटाला सामान्यतः खंडाळ्याचा घाट असे म्हणले जाते.[ संदर्भ हवा ]

पुस्तके

[संपादन]

अनेक मराठी कथा-कादंबऱ्या-गाणी यांमध्ये खंडाळ्याच्या घाटाचे नाव येते. मराठी लेखिका शुभदा गोगटे यांनी ’१०,००० प्राणांच्या आहुतीमधून साकारलेल्या खंडाळ्याच्या घाटासाठी’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.[] मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बांधला गेला त्याकाळात खंडाळा घाटाच्या बांधणीचा इ.स. १८५३ ते इ.स. १८६५ या दहा वर्षांचा खडतर पट या पुस्तकात गोगटे यांनी मांडला आहे. एका शाळकरी मुलाला रेल्वेविषयी आकर्षण वाटत असते. घरातून परवानगी न घेता तो बांधणी सुरू असलेल्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरच्या खंडाळ्याला येतो; त्या रेल्वे मार्गाच्या बांधणीत काम करू लागतो. त्याला इंग्रजी येत असल्याने ब्रिटिश अधिकारी आणि कामगार यांच्यातील दुवा म्हणून तो जे काम करतो, त्याची हकीकत या पुस्तकात आहे.[ संदर्भ हवा ]

खंडाळ्यावरच्या काही कविता-गीते

[संपादन]
  • कशासाठी पोटासाठी खंटाळ्याच्या घाटासाठी (बालगीत, कवी : माधव ज्युलियन)
  • ऐ क्या बोलती तू?, ऐ क्या मैं बोलू?, सुन, सुना, आती क्या खंडाला? क्या करूं, आ के मैं खंडाला? (चित्रपटगीत, हिंदी चित्रपट : गुलाम (१९९८), गायक-गायिका : आमिर खान-अलका याज्ञिक, गीतकार : नितीन रायकवार, संगीत दिग्दर्शक : जतिन-ललित)
  • मिटून हे डोळे मन माझे बोले .... कसे चढू अर्ध्यात आज चुकलोया वाट, अन् मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट (चित्रपटगीत, मराठी चित्रपट - ये रे ये रे पैसा (२०१७), गायिका-गायक : वैशाली सामंत-अवधूत गुप्ते-स्वप्निल बांदोडकर, गीतकार : क्षितिज पटवर्धन, संगीत दिग्दर्शक : अमृतराज)
  • तुला फिरवतो खंडाळा घाट (कवी : मुकेश वीर, गायक : संकल्प गोरे, संगीतकार : हर्षवर्धन मोरे)
  • देले पोरी तुले खंडाळा घाट (वऱ्हाडी चित्रपटगीत, मराठी चित्रपट - मुंबई मले दाखवा (१९९९), गायक : दिनकर शिंदे-सुरेश शिंदे)

बोर घाटातील रेल्वे स्थानके

[संपादन]
बोरघाटातील रेल्वे स्थानके
# स्थानकाचे नाव वर्णन कि.मी.
इंग्रजी मराठी स्टेशन संकेतांक
Palasdari पळसदरी PDI Start
Thakurvadi ठाकुरवाडी TKW Minor Halt
Monkey Hill मंकी हिल MNLC Technical Halt, no tickets issued १६
Khandala खंडाळा KAD End २१


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "खंडाळ्याच्या घाटासाठी - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-06-01 रोजी पाहिले.