Jump to content

क्लॅरिचे ओर्सिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्लॅरिचे ओर्सिनी (१४५३१४८८) [] ही मध्ययुगीन इटलीमधील एक खानदानी स्त्री होती. हे फिरेंझेच्या शासक लॉरेंझो इल मॅग्निफिकोची पत्नी होती व माद्दालेना आणि याकोपो ओर्सिनी यांची मुलगी होती. []

क्लॅरिचे आणि लॉरेंझे यांचे लग्न ४-८ जून, १४६९ असे चार दिवसांत झाले [] हे लग्न लॉरेंझोच्या आई लुक्रेझिया तोर्नाबुओनीने आपल्या मुलाचा व मेदिची कुटुंबाचा सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी जुळवले होते. [] लग्नाच्यावेळी लॉरेंझो आणि क्लॅरिचे साधारण एकाच वयाचे होते. तत्कालीन इटलीत हे नवल होते. [] क्लॅरिचेचा हुंडा 6,000 फ्लोरिन होता. []

लग्नानंतर लॉरेंझोने तिचा रिनाल्दोला फिरेंझेचा आर्चबिशप पदावर निवडून येण्यात मदत केली होती.[] फिरेंझेचे नागरिक आपली गाऱ्हाणी घेउन तिच्याकडे येत असत[] तिने आपले स्वतःचे हेरवजा ओळखींचे जाळे रचले होते. त्याद्वारे ती सैन्याच्या हालचाली आणि लढायांसह दूरवरच्या राजकीय आणि लष्करी घटनांबद्दल माहिती गोळा करीत असे. []

क्लॅरिचे ३० जुलै, १४८८ रोजी फिरेंझेमध्ये मृत्यू पावली. [] त्यावेळी लॉरेंझो तिच्या जवळ नव्हता. तो स्वतः खूप आजारी असल्याने सिएनाजवळ होता. तो अंत्यसंस्कारालाही येऊ शकला नाही. []

पोप इनोसंट आठव्याला लिहिलेल्या पत्रात लॉरेंझो दिवंगत पत्नीची खूप आठवण येते.

अपत्ये

[संपादन]

क्लॅरिचे आणि लॉरेंझो यांना दहा मुले झाली:

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d Tomas 2003.
  2. ^ a b Pernis & Adams 2006.
  3. ^ Tomas 2003, पान. 59.
  4. ^ Tomas 2003, पान. 51,62.
  5. ^ Tomas 2003, पान. 61-62.
  6. ^ a b Tomas 2003, पान. 24.