Jump to content

कोह पो सेंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे चिनी नाव असून, आडनाव कोह असे आहे.

कोह पो सेंग (देवनागरी लेखनभेद: कोह पोह सेंग, कोह पो संग; रोमन लिपी: Goh Poh Seng;) (इ.स. १९३६ - जानेवारी १०, इ.स. २०१०) हा सिंगापूर-ब्रिटिश मलायात जन्मलेला व नंतर कॅनडा देशात स्थायिक झालेला इंग्लिश भाषेतील कवी, कादंबरीकार, नाटककार होता. त्याने लिहिलेल्या इफ वी ड्रीम टू लॉंग या पहिल्या कादंबरीला इ.स. १९७६ साली सिंगापुरातल्या नॅशनल बुक डेव्हलपमेंट काउन्सिलाचा ललित साहित्यासाठी पुरस्कार मिळाला, तसेच त्याचे रशियनतागालोग भाषांत अनुवादही प्रकाशित झाले. इ.स. १९८२ साली सिंगापुरातला सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, म्हणजे कल्चरल मेडॅलियन (साहित्य क्षेत्रासाठी) देऊन कोह पो सेंगाला गौरवण्यात आले.

बाह्य दुवे

[संपादन]