कोलोरिआंग
Appearance
(कोलोरियांग या पानावरून पुनर्निर्देशित)
कोलोरिआंग हे भारताच्याअरुणाचल प्रदेश राज्यातील कुरुंग कुमे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे शहर तिबेटच्या सीमेला लागून आहे आणि त्याची उंची १,००० मीटर (३,३०० फूट) आहे. [१] कोलोरिआंग चहूबाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेले असून [२] आणि सुबांसिरी नदीच्या प्रमुख उपनद्यांपैकी एक असलेल्या कुरुंग नदीच्या उजव्या तीरावर आहे. येथील हवामान पावसाळी आणि उन्हाळ्यात उष्ण आणि हिवाळ्यात खूप थंड असते.
संदर्भ
[संपादन]- ^ Arunachal Pradesh District Gazetteers: Tirap District, Government of Arunachal Pradesh, 1981
- ^ Toni Huber, Stuart Blackburn (2012). Origins and Migrations in the Extended Eastern Himalayas. Brill Publishers. p. 73. ISBN 978-9004226913. 30 July 2015 रोजी पाहिले.